अमिताभचं नाव घेत 'या' सिनेमासाठी मिळालेली गोविंदाला धमकी, पुढे घडलं असं काही की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 20:30 IST2024-04-05T20:30:01+5:302024-04-05T20:30:01+5:30
गोविंदा आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक खास किस्सा. जेव्हा अमिताभ यांच्या नावाखाली गोविंदाला मिळालेली धमकी

अमिताभचं नाव घेत 'या' सिनेमासाठी मिळालेली गोविंदाला धमकी, पुढे घडलं असं काही की...
गोविंदा हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. गोविंदाने आजवर विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. गोविंदाचे सिनेमे म्हणजे हमखास मनोरंजनाची गॅरंटी हे समीकरण ठरलेलं आहे. गोविंदा आता जरी इतकं काम करत नसला तरीही त्याचे सिनेमे प्रेक्षकांना खळखळून हसवतात. गोविंदाबद्दल एक खास किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांच्या कारणास्तव गोविंदाला धमकी आली होती. काय होता तो किस्सा?
सिनेमा होता 'बडे मिया छोटे मिया'. या सिनेमाच्या निमित्ताने गोविंदा आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करणार होते. सर्वांना सिनेमाची उत्सुकता होती. १९९२ साली आलेल्या 'खुदा गवाह' सिनेमानंतर अमिताभ यांचे अनेक सिनेमे फ्लॉप ठरले. ते काही सिनेमांतून छोट्या छोट्या भूमिकेत दिसत होते. परंतु त्यांच्या नावावर एकही सुपरहिट सिनेमा त्याकाळी नव्हता. त्यामुळे सर्वांना अमिताभ - गोविंदा यांच्या 'बडे मिया छोटे मिया' सिनेमाची उत्सुकता होती.
Which one is better.
— SKY Reviews (@SKYReviews1) February 20, 2024
Retweet for New Bade Miyan Chote Miyan (@akshaykumar@iTIGERSHROFF )
Like for Old Bade Miyan chote Miyan ( @SrBachchan#govinda )#BadeMiyanChoteMiyanTitleTrack#BadeMiyanChoteMiyan#BadeMiyanChoteMiyanOnEid2024#AkshayKumar𓃵#TigerShroff#skyreviewspic.twitter.com/jLcy2Up3WE
गोविंदा त्या काळात एकामागून एक सुपरहिट कॉमेडी सिनेमे करत होता. जेव्हा गोविंदाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'बडे मिया छोटे मिया' सिनेमा साईन केला तेव्हा त्याला धमक्यांचे फोन आले. "तू हा सिनेमा केलास आणि सिनेमा सुपरहिट झाला तर सर्व श्रेय अमिताभ बच्चन घेऊन जातील. त्यामुळे हा सिनेमा तू साईन करु नकोस", अशा धमक्या गोविंदाला आलेल्या. पण गोविंदाने हा सिनेमा केला आणि सिनेमा सुपरहिट झाला.