तीन लग्न, ३७ वर्षे लहान गायिकेसोबत रोमांस, वादाच्या भोवऱ्यात अडकला होता हा कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 11:41 AM2023-07-28T11:41:12+5:302023-07-28T11:41:34+5:30

३७ वर्षे लहान गायिकेसोबतच्या रिलेशनशीपमुळे हा कलाकार चर्चेत आला आहे.

Three marriages, 37 years of romance with a younger singer, this artist was caught in the vortex of controversy | तीन लग्न, ३७ वर्षे लहान गायिकेसोबत रोमांस, वादाच्या भोवऱ्यात अडकला होता हा कलाकार

तीन लग्न, ३७ वर्षे लहान गायिकेसोबत रोमांस, वादाच्या भोवऱ्यात अडकला होता हा कलाकार

googlenewsNext

सलमान खान(Salman Khan)चा रिएलिटी शो बिग बॉस (Bigg Boss) जितका लोकप्रिय आहे तितकाच तो वादग्रस्तही आहे. प्रत्येक सीझनला काहीना काही घडत असते. ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसते. मात्र बिग बॉस १२मध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं. जे पाहून सगळे हैराण झाले होते. या सीझनमध्ये भजन सम्राट अनूप जलोटा (Anup Jalota) कंटेस्टंट म्हणून हजेरी लावली होती. तुम्हाला आठवत नसेल तर आम्ही सांगतो की, सलमानच्या शोवर ते गर्लफ्रेंड जसलीन मथारु(Jasleen Matharu)सोबत आले होते. जेव्हा दोघांनी नॅशनल टीव्हीवर ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. हे ऐकून सगळे अचंबित झाले होते. 

जसलीन मथारुचं नाव त्यावेळी चर्चेत आले होते जेव्हा तिने तिच्या वयाच्या दुप्पपट असलेल्या भजन सम्राट गायकासोबत एन्ट्री केली होती. शोमध्ये दोघांनी ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगून सहभाग घेतला होता. फक्त त्यांनी स्टेजवर एवढंच सांगितलं होतं आणि ही गोष्ट वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. पसरवायचीदेखील होती अनूप जलोट संगीत जगतातील मोठं नाव आहे.

अनूप आणि जसलीन यांच्या नात्यावर सर्वांनाच होता संशय

भजन सम्राट आणि जसलीनच्या नात्याबद्दल ऐकल्यानंतर सर्वजण हैराण झाले होते. कोणालाच विश्वास बसत नव्हता की हे दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत. मग दोघांनी बिग बॉसच्या घरात राहून सर्वांना त्यांच्या नात्यावर विचार करायला भाग पाडले. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनुप जलोटा यांनी खुलासा केला की, जसलीन फक्त त्यांची विद्यार्थी आहे. अनूप आणि जसलीन यांच्या नात्यावर सर्वांनाच संशय होता. मात्र काही काळ ते दोघे प्रेमात इतके बुडाले होते की, प्रत्येक जणांना ही खोटी लव्हस्टोरी खरी वाटू लागली. दोघे खऱ्या आयुष्यात पार्टनर नाही बनू शकले. मात्र त्यांनी एका सिनेमात एकत्र काम केले. अनुप जलोटा आणि जसलीन २०२१ मध्ये रिलीज झालेला चित्रपट वो मेरी स्टुडंटमध्ये झळकले होते.

तीन लग्न ठरली अपयशी

६९ वर्षांच्या अनूप जलोटा यांनी तीन लग्नं केली आहेत. त्यांचे पहिले लग्न गुजरातमधील सोनाली सेठसोबत झाले होते. दोघांनी घरच्यांच्या विरोधात लग्न केले होते. मात्र काही काळ एकत्र राहिल्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. सोनालीपासून वेगळे झाल्यानंतर अनूप यांचे दुसरे लग्न बीना भाटियासोबत झाले. परंतु दुसरे लग्न देखील फार काळ टिकले नाही आणि गायक आपल्या पत्नीपासून विभक्त झाले. अनुप यांची दोन लग्नं अयशस्वी ठरली. पण त्यांच्या प्रेमावर आणि नात्यावर विश्वास ठेवला नाही. माजी पंतप्रधान आयके गुजराल यांची भाची मेधा गुजराल यांच्याशी त्यांनी तिसरे लग्न केले. पण आजारपणामुळे २०१४मध्ये त्यांचे निधन झाले.

Web Title: Three marriages, 37 years of romance with a younger singer, this artist was caught in the vortex of controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.