उज्बेकिस्तानमध्ये 'अकेली'च्या शूटिंगदरम्यान तिघे झाले गायब आणि मग..., सर्वांचे प्राण आले होते कंठाशी; वाचा हा किस्सा

By तेजल गावडे | Published: August 24, 2023 01:39 PM2023-08-24T13:39:14+5:302023-08-24T13:39:29+5:30

Akelli Movie : इराक-सीरियामध्ये युद्ध परिस्थिती ओढवलेली असताना, इराकमध्ये नोकरीसाठी गेलेल्या सामान्य भारतीय तरुणीची कथा म्हणजे 'अकेली'. हा चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

Three people disappeared during the shooting of 'Akeli' in Uzbekistan and then..., all were killed; Read this story | उज्बेकिस्तानमध्ये 'अकेली'च्या शूटिंगदरम्यान तिघे झाले गायब आणि मग..., सर्वांचे प्राण आले होते कंठाशी; वाचा हा किस्सा

उज्बेकिस्तानमध्ये 'अकेली'च्या शूटिंगदरम्यान तिघे झाले गायब आणि मग..., सर्वांचे प्राण आले होते कंठाशी; वाचा हा किस्सा

googlenewsNext

इराक-सीरियामध्ये युद्ध परिस्थिती ओढवलेली असताना, इराकमध्ये नोकरीसाठी गेलेल्या सामान्य भारतीय तरुणीची कथा म्हणजे 'अकेली' (Akelli Movie). हा चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री नुसरत भरुचा (Nusrat Bharucha) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून आतापर्यंत न पाहिलेल्या अशा अंदाजात ती दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग उज्बेकिस्तानमध्ये पार पडले आहे. तिथे शूटिंग करताना आलेला अनुभव आणि गमतजमती चित्रपटाच्या निर्मात्या अपर्णा पाडगावकर (Aparna Padgaonkar) यांनी लोकमतशी बोलताना सांगितल्या आहेत.

अकेली चित्रपटाचं शूटिंग उज्बेकिस्तानमध्ये झाले आहे. तिथे शूटिंग करताना जेवढी गंमत होती तेवढ्याच अडचणीदेखील होत्या. तसेच इथे शूटिंगवेळी खूप प्रॉब्लेम होते. स्वित्झर्लंड, लंडन सारख्या देशांसारखे इथे फारसे शूट होत नाहीत. उज्बेकिस्तान शूटिंग फ्रेंडली ठिकाण नव्हते. तिथे भाषेचाही प्रॉब्लेम होता. तिथे प्रामुख्याने रशियन आणि उझबेक भाषा बोलली जाते. इंटरनेटचा वापर खूप कमी केला जातो. शाकाहारी जेवणाऱ्याचे तिथे हालच होतात. कारण तिथे सॅलाड माहित आहे. भाजी पोळी, वरण भात करतच नाही. तसेच तिथे जाण्यासाठी थेट विमान नाही. त्यासाठी तुम्हाला दुबई किंवा मस्कटला जावून वेगळ्या फ्लाइटने जावे लागते. 

उज्बेकिस्तानमधील लोकांचं बॉलिवूडवर प्रेम
त्या पुढे म्हणाल्या की, उज्बेकिस्तानला एकदा तर माणसं पोहचली पण कॅमेरा मस्कटला एअरपोर्टवर अडकून पडला होता. मग कनेक्ट करणे, तिथल्या लोकांना समजावून सांगणे आणि ते सोडवणे सर्व खूप कठीण गेले. पण आता आठवलं की फार गंमत वाटते. पण तिकडच्या माणसांचे बॉलिवूडवर खूप प्रेम आहे. त्यांना बॉलिवूडबद्दल माहित आहे. आमच्या टीममधील एक जण टॅक्सीने जात होती. एकतर तिथली भाषा कळत नाही आणि त्यांना आपली भाषा कळत नाही. तो तिला काय सांगत होता ते तिला कळत नव्हतं. टॅक्सी कुठेतरी भलतीकडे जात होती. जेव्हा त्याला कळलं की ही शूटिंगसाठी आली आहे, तर तो तिला मला रोल दे असे सांगत होता. आम्हाला तिथे काम करताना अजिबात भीती वाटली नाही. त्यांना आपल्या इथे शूटिंग होत आहे, याचं फार कौतुक वाटत होते.   

दोन तास सगळ्यांचे प्राण आले होते कंठाशी
अपर्णा पाडगावकर यांना शूटिंगदरम्यान आलेल्या गंमतीशीर अनुभवाबद्दल म्हणाल्या की, आमच्या शूटमध्ये लाल रंगाची गाडी आहे. आम्ही शूटिंगसाठी गाडीची वाट पाहत होतो. तो माणूस म्हणाला की, मी तिथेच जवळपास आहे. लोकेशन शोधतोय. आमचा प्रॉडक्शन माणूस त्याला बघायला गेला. पाऊणतास झाला तरी त्याचा पत्ता नव्हता. मग दुसरा बघायला गेला. त्याला पण जावून अर्धा तास झाला. मग तिसरा माणूस गेला. मग गाडी लांबून येताना दिसली. गाडी आली तेव्हा त्यात तो फक्त ड्रायव्हर होता. त्याला बघायला गेलेली माणसंच नव्हती. त्यामुळे भयंकर टेंशन आलं. गाडीवाल्यालाही लोकेशन शोधत शोधत यायला दोन तास लागले. सर्व कम्युनिकेशन ट्रान्सलेटरच्या माध्यमातून होत होते. त्याला आपली भाषा कळणार मग तो ट्रान्सलेट करणार त्यांना सांगणार मग ते काय म्हणाले ते आपल्याला सांगणार. ते तिघेही दोन तासांनी आले. ते देखील रस्ता चुकले होते. पण दोन तास सगळ्यांचे प्राण कंठाशी आले होते. अशा खूप गमतीजमती झाल्या. 

समोसासारखाच साम्सा...
त्यांनी तिथल्या खाद्यपदार्थाबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, आपल्याकडे जसा समोसा मिळतो. तसा तिथे साम्सा मिळतो. संध्याकाळी नाश्त्यासाठी सामसाशिवाय काहीच मिळत नव्हते. त्यामुळे काही दिवसांनी ते खाऊन खाऊन सर्वांना कंटाळा आला होता. साम्सादेखील नॉनव्हेज मिळायचा. कुणाला तरी सांगून बटाट्याचाही बनू शकतो असे सांगून बनवायला सांगितले. पण ते शिकेपर्यंत त्यांना तो साम्सापण नको झाला होता.

Web Title: Three people disappeared during the shooting of 'Akeli' in Uzbekistan and then..., all were killed; Read this story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.