​तीन वर्षांपूर्वी थोडक्यात बचावल्या होत्या श्रीदेवी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 08:12 AM2018-02-25T08:12:22+5:302018-02-25T13:46:28+5:30

मृत्यू कदाचित फार पूर्वीपासून श्रीदेवींवर टपून बसला होता. होय, तीन वर्षांपूर्वी एका भीषण अग्निकांडातून श्रीदेवी अगदी थोडक्यात बचावल्या होत्या. ...

Three years ago Srebadevi was rescued briefly | ​तीन वर्षांपूर्वी थोडक्यात बचावल्या होत्या श्रीदेवी

​तीन वर्षांपूर्वी थोडक्यात बचावल्या होत्या श्रीदेवी

googlenewsNext
त्यू कदाचित फार पूर्वीपासून श्रीदेवींवर टपून बसला होता. होय, तीन वर्षांपूर्वी एका भीषण अग्निकांडातून श्रीदेवी अगदी थोडक्यात बचावल्या होत्या. ही आग इतकी भीषण होती की, श्रीदेवी ज्या बेडवर झोपायच्या तो बेडही जळून खाक झाला होता. अर्थात या आगीतून श्रीदेवींना कुठलीही दुखापत वा इजा झाली नव्हती.
नोव्हेंबर २०१३ सालची ही घटना. श्रीदेवी व बोनी कपूर यांच्या अंधेरीस्थित बंगल्याला संध्याकाळी अचानक आग लागली. ही आग लागली तेव्हा श्रीदेवी दोन्ही मुली जान्हवी व खुशी सोबत बंगल्यात होत्या. जान्हवीच्या बेडरूममधून किंचाळण्याचा आवाज आला आणि सगळीकडे एकच अफरातफरी माजली. यानंतर श्रीदेवी, जान्हवी, खूशी सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आग लागली तेव्हा बोनी कपूर बंगल्यात नव्हते. बातमी कळताच ते तात्काळ घरी आले. या आगीत श्रीदेवींचे बेडरूम पूर्णपणे जळून खाक झाले होते. या रूममधील पेन्टिंग्स आणि वार्डरोब सगळे काही जळून राख झाले. ही आग आणखी रौद्ररूप धारण करू शकत असती. पण श्रीदेवी यांनी प्रसंगावधान राखत घरातील स्विच बंद केलेत आणि आग संपूर्ण घरात पसरली नाही. आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. या आगीतून श्रीदेवी केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच बचावल्या होत्या. त्यावेळी मृत्यू आपला डाव साधू शकला नाही. पण काल शनिवारी रात्री मृत्यूने अखेर आपला डाव साधलाच. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना हृदयविकाराच्या धक्क्याने श्रीदेवींचा मृत्यू झाला.
 श्रीदेवी यांच्या या अचानक एक्झिटमुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. दरमयन श्रीदेवीचे पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या दुबईत पोस्टमार्टमची प्रक्रिया सुरू असून, पार्थिक रात्री उशिरापर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, श्रीदेवी यांचे पार्थिव सध्या दुबई पोलिसांच्या ताब्यात आहे. 

ALSO READ : एक दुर्दैवी योगायोग! अर्जुनप्रमाणेच जान्हवीचा ‘डेब्यू’ पाहण्यासाठीही आई नाही!!

श्रीदेवींचे पार्थिव यूएईच्या रास अल खैमा येथून दुबई येथे आणण्यात आले आहे. दुबई येथील कायद्यानुसार सुरुवातीला पोलिसांकडून सखोल तपास आणि चौकशी केली जाईल. सुरुवातीला स्थानिक पोलीस तपास करणार, त्यानंतर पोस्टमार्टम केले जाईल. पोलिसांकडून ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर पार्थिव परिवाराकडे सुपूर्द केले जाणार आहे. 

Web Title: Three years ago Srebadevi was rescued briefly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.