रवीना टंडनने घेतली होती सलमानसोबत कधीही काम न करण्याची शपथ, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 01:09 PM2022-01-16T13:09:53+5:302022-01-16T13:16:56+5:30
Salman Khan Raveena Tandon : रवीना बेधडक अभिनेत्री. त्यामुळेच चित्रपटसृष्टीत वावरताना तिनं कधी कुणाची पर्वा केली नाही. अनेक स्टार्ससोबत तिचं पटायचं नाही. सलमान खान त्यापैकीच एक.
रवीना टंडनने (Raveena Tandon) 80 व 90 चं दशक गाजवलं. बहुतेक मोठ्या स्टार्ससोबत तिनं काम केलं. एकेकाळी प्रत्येक निर्माता-दिग्दर्शक रवीनाला चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक असायचा. पण रवीना स्वत:च्या अटींवर चित्रपट करायची. रवीना तशी बेधडक अभिनेत्री. त्यामुळेच चित्रपटसृष्टीत वावरताना तिनं कधी कुणाची पर्वा केली नाही. मनाला पटेल तसंच ती वागली. अनेक स्टार्ससोबत तिचं पटायचं नाही. सलमान खान (Salman Khan) त्यापैकीच एक. सलमान व रवीनाचं जराही पटायचं नाही आणि म्हणूनच त्याच्यासोबत कधीही काम करायचं नाही, अशी शपथच रवीनानं घेतली होती.
होय, 2017 मध्ये आरजे अनमोलच्या ‘माय लाईफ, माय स्टोरी’ या चॅट शोमध्ये खुद्द रवीनाने हा खुलासा केला होता.
ती म्हणाली होती, ‘सलमान व माझं छोट्या छोट्या कारणांवरून भांडण व्हायचं. अगदी बबल गमसाठीही आम्ही भांडलेलो आहोत. कधीकधी आम्ही इतकं भांडायचो की, आमच्या भांडणांमुळे दिग्दर्शकही वैतागायचे. ‘पत्थर के फूल’या सिनेमात आम्ही एकत्र काम करत होतो. सेटवर आमचे प्रचंड खटके उडायचे. एकदा आमचं इतकं जोरात वाजलं की आम्ही दोघांनीही यापुढे कधीही एकत्र काम करायचं नाही, अशी शपथ घेतली होती. अर्थात तरीही ‘अंदाज अपना अपना’या चित्रपटात आम्ही एकत्र काम केलंच. पण या चित्रपटाच्या सेटवरही आम्ही खूप भांडायचो. दिग्दर्शकही आमच्या भांडणांना वैतागले होते. या भांडणामुळेच मी व सलमानने फार चित्रपटात काम केलं नाही.
1999 मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटासाठी रवीनाला विचारणा झाली होती. मात्र तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. अर्थात आज सलमान व रवीना चांगले मित्र आहेत.
‘एकेकाळी आम्ही कितीही भांडलो असलो तरी सलमान एक सच्चा मित्र आहे. जेव्हा केव्हा मला गरज पडली,तेव्हा तेव्हा सलमान माझ्यासाठी धावून आला. तो माणूस म्हणून खूप चांगला आहे,’ असं रवीना म्हणते ते त्यामुळेच.