Throwback Photos : एकेकाळी रेखा यांच्या बोल्ड फोटोशूट्सनी माजवली होती खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 09:00 PM2019-09-22T21:00:00+5:302019-09-22T21:00:00+5:30
रेखा यांनी एकेकाळी त्यांच्या फोटोशूट्सने चाहत्यांमध्ये खळबळ माजवली होती.
उमराव जान, इजाजत, घर आणि कलयुगसारख्या चित्रपटातील अभिनेत्री रेखा यांना भारताची ग्रेट गार्बो असं संबोधलं जातं. रेखा यांनी फक्त त्यांच्या काळातच नाही तर आताही त्यांच्या स्टाईल व सौंदर्यानं सर्वांना भुरळ पाडली आहे. रेखा यांनी एकेकाळी त्यांच्या फोटोशूट्सने चाहत्यांमध्ये खळबळ माजवली होती.
रेखा यांनी त्यांच्या फिल्मी करियरची सुरूवात १९७० साली प्रदर्शित झालेला चित्रपट सावन भादोमधून केली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट चित्रपट दिले.
त्यांना त्यांच्या करियरमध्ये खूप संघर्ष करावा लागला होता.
रेखा यांनी काजोलसोबत एक फोटोशूट केलं होतं. या फोटोची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. त्याकाळी त्यांनी केलेलं फोटोशूट खूप बोल्ड मानलं जातं.
काजोल व रेखा यांचं फोटोशूट सिने ब्लिट्स मासिकाच्या मुखपृष्ठावर १९९६ साली प्रदर्शित झालं होतं. या कव्हरफोटोत त्या दोघींनी एकच स्वेटर घातलं होतं. त्याशिवाय त्यांच्या अंगावर काहीच कपडे नव्हते. त्यावेळी या फोटोवर खूप उलटसुलट कमेंट्स आल्या होत्या.
रेखा बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री असून त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच अफवा ऐकायला मिळत असतात. त्या कोणाच्या नावाचं सिंदूर लावते. या वयातही त्या एकट्या राहतात. अशा बऱ्याच गोष्टींबद्दल ट्रोल केलं जातं. तरीदेखील त्या बिन्धास्त आहेत.
वयाच्या ६४ व्या वर्षीदेखील रेखा यांचं सौंदर्य सर्वांना भुरळ पाडतं ही कमालीची बाब आहे.