VIDEO : लहान मुलीला स्वत:च्या हाताने घास भरवताना दिसला सुशांत, फॅन्स करून लागले भरभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 12:38 PM2020-09-10T12:38:06+5:302020-09-10T12:40:17+5:30
सुशांतचा हा व्हिडीओ पाहून त्याचे फॅन्स इमोशनल झाले आहेत. ते सुशांतने केलेल्या या कामाचं भरभरून कौतुक करत आहेत. हा जुना व्हिडीओ शेअर करत श्वेताने लिहिले की, 'एक सुंदर आणि काळजी घेणारं हृदय'.
सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्तीने तिच्या सोशल मीडियात अकाउंटवर भाऊ सुशांत सिंह राजपूतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या जुन्या व्हिडीओत सुशांत सिंह राजपूत एका छोट्या मुलीला हाताने जेवण भरवताना दिसत आहे. हा व्हिडीओ २०१९ मध्ये 'सोनचिडिया' सिनेमाचं शूटींग करतानाचा आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल झालाय.
सुशांतचा हा व्हिडीओ पाहून त्याचे फॅन्स इमोशनल झाले आहेत. ते सुशांतने केलेल्या या कामाचं भरभरून कौतुक करत आहेत. हा जुना व्हिडीओ शेअर करत श्वेताने लिहिले की, 'एक सुंदर आणि काळजी घेणारं हृदय'. त्यासोबतच तिने या पोस्टसाठी #JusticeForSushantSinghRajput असा हॅशटॅगही वापरला आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत केसची सीबीआय चौकशी सुरू आहे. या केसमधील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला एनसीबीने ड्रग्स केसमध्ये अटक केलीय. रियाला २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. ती सध्या भायखळा येथील तुरूंगात आहे.
रियाच्या अटकेनंतर श्वेताची प्रतिक्रिया
रियाला अटक करण्यात आली. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याच्यासह 10 लोकांना याप्रकरणी अटक केली आहे. रिया चक्रवर्तीला अटक होताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. रियाच्या अटकेच्या बातमीने सुशांतचे चाहते आनंदात आहेत. सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंग आणि सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड यांनीही या कारवाईनंतर आनंद व्यक्त करत परमेश्वराचे आभार मानले आहेत.
रियाचा यु-टर्न
एनसीबीच्या चौकशीत आधी आपण ड्रग्ज घेत नसल्याचे रियाने म्हटले होते. मात्र तिस-या दिवशी रियाने अचानक रियाने यु-टर्न घेत, आपला जबाब बदलला. मी कधीही ड्रग्ज घेतले नाही, असे म्हणणा-या रियाने ड्रग्ज घेतल्याचे कबुल केले. मात्र सुशांतने मला ड्रग्ज घेण्यासाठी विवश केले, असे तिने म्हटले.
टाइम्स नाऊने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तानुसार, मंगळवारी चौकशीदरम्याने रियाने गांजाचे सेवन केल्याची कबुली दिली. सुशांतने आग्रह केल्यामुळे कदाचित मी कधी गांजाचे सेवन केले असावे, असे तिने या चौकशीदरम्यान म्हटल्याचे कळते. यापूर्वीच्या जबाबात रियाने ड्रग्ज व गांजाचे कधीही सेवन न केल्याचा दावा केला होता. अगदी आज तकला दिलेल्या मुलाखतीतही तिने ठासून हा दावा केला होता़ मी कधीही ड्रग्ज घेतले नाही़ मी ब्लड टेस्टसाठीही तयार आहे, असे तिने म्हटले होते.
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आला होता. यानंतर या प्रकरणाने अचानक वेगळे वळण घेतले होते. ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक यांचे कनेक्शन समोर येताच एनसीबी अॅक्टिव्ह मोडमध्ये आली होती. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एनसीबीने रियाला चौकशीस हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.
हे पण वाचा :
देव आमच्यासोबत...! रियाला अटक होताच सुशांतची बहीण भावूक, अंकितानेही अशी दिली रिअॅक्शन
'मी निरपराध, मला या गुन्ह्यात अडकवण्यात आलंय'; रियाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
अंकिता लोखंडेने रियाला झापलं, म्हणाली - 'इतकं प्रेम होतं तरी ड्रग्स कसं घेऊ दिलं?'