हृतिक रोशनचा जुना फोटो होतोय व्हायरल, यातला एक चिमुरडा आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 12:11 PM2021-12-27T12:11:10+5:302021-12-27T12:15:02+5:30
'फिजा'सिनेमाच्या सेटवरचा हा फोटो असून हृतिक (Hritik Roshan) बरोबर दोन लहान मुलं दिसत आहे. हा फोटो पाहून हृतिकविषयी नाही तर दोन चिमुकल्यांवर चर्चा रंगल्या आहेत.
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे सेलिब्रेटींचे फिल्मी करिअर पासून खासगी आयुष्यातल्या सगळ्याच घडामोडी चाहत्यांपर्यंत थेट पोहचतात. कित्येक फॅन्स त्याच्यावर अक्षरक्षः जीव ओवाळून टाकतात. त्यामुळे आपल्या या लाडक्या स्टारविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. त्याच्याविषयीच्या विविध बारीकसारीक गोष्टींमध्ये रसिकांना रस असतो. त्यातच या लाडक्या स्टारचे जुने फोटो पाहायला मिळाले तर क्या बात.
सध्या सोशल मीडियावर हृतिक रोशनचा (Hritik Roshan) एक जुना फोटो व्हायरल होत आहे. 'फिजा'सिनेमाच्या सेटवरचा हा फोटो असून हृतिक बरोबर दोन लहान मुलं दिसत आहे. हा फोटो पाहून हृतिकविषयी नाही तर दोन चिमुकल्यांवर चर्चा रंगल्या आहेत. कारण त्यातला एक चिमुरडा आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता. या अभिनेत्याचे खरेखुरे किंवा डायहार्ट फॅन तुम्ही असाल तर या फोटोत अभिनेत्याला ओळखणं तुमच्यासाठी फार कठीण काम नाही.
काहींनी त्याल बघताच ओळखलं तर काहींना ओळखणं कठिण गेलं. या फोटोंवर अभिनेत्याला ओळखण्यापासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्याच घडामोडींवर चाहते एक से बढकर एक भन्नाट कमेंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बरोबर ओळखलंत हा चिमुरडा दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे विकी कौशल.विकी कौशलमुळेच हृतिकचा हा फोटो व्हायरल होत आहे. अल्पावधीतच या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु झाला. आम्ही तर या फोटोत विकी कौशलला ओळखले आहे, आता तुम्हीसुद्धा ओळखा पाहू यातील विकी कौशल कोण आहे ?
विकी कौशल (Vicky Kaushal) कतरिना कैफचे (Katrina Kaif) लग्नही या वर्षात चांगलेच चर्चेत राहिले. विकी आणि कॅटचे लग्न राजस्थानच्या सवाई माधोपूरच्या चौथच्या बरवाडा पार पडले होते. हे लग्न अतिशय आलिशान झाले होते. या जोडप्याने लग्नाचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करताच या दोघांच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेम व्यक्त करत लग्नाच्या शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले.लग्नानंतर काही दिवस दोघांनी एकत्र घालवल्यानंतर दोघेही पुन्हा आपापल्या कामात बिझी झाले आहेत. लग्नाआधी आपले नाते जगापासून लपवून ठेवणारे हे लव्हबर्डस आता सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटीक फोटो शेअर करत जाहीरपणे आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात.