Thugs of Hindostan First Song : ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे पहिले गाणे ‘वशमल्ले’ची एक झलक पाहून व्हाल दंग!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 15:53 IST2018-10-16T15:51:26+5:302018-10-16T15:53:03+5:30
आमिर खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे पहिले गाणे ‘वशमल्ले’ रिलीज झालेय.

Thugs of Hindostan First Song : ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे पहिले गाणे ‘वशमल्ले’ची एक झलक पाहून व्हाल दंग!!
आमिर खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे पहिले गाणे ‘वशमल्ले’ रिलीज झालेय. होय, या गाण्यात मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांना थिरकताना आपण पाहू शकणार आहोत. डान्सिंग सुपरस्टार आणि इंडियन मायकल जॅक्सन नावाने ओळखला जाणारा कोरिओग्राफर प्रभुदेवाने हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. ‘मि. बच्चन यांच्यासोबत डान्स करताना कमालीचा उत्सूक होतो. करिअरमध्ये प्रथमच मी डान्स इतका एन्जॉय केला,’ असे आमिरने हे गाणे शेअर करताना लिहिले आहे.
अमिताभ भट्टाचार्य याने निहिलेल्या या गाण्याला संगीत दिले आहे. अजय-अतुलने़ अलीकडे जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरच्या ‘धडक’ या गाण्यालाही अजय-अतुलनेचं संगीत दिले होते. सुखविंदर सिंह आणि विशाल ददलानी यांनी हे गाणे गायले आहे.
‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.