ठग्स आॅफ हिंदोस्तानचे चित्रीकरण झाले घनदाट जंगलात, चित्रपटाच्या टीमला या गोष्टींचा करावा लागला सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 08:30 PM2018-11-01T20:30:00+5:302018-11-01T20:30:00+5:30

ठग्स आॅफ हिंदोस्तान या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे थायलंडमधील माल्टा या परिसरात झालेले आहे. माल्टा हे अतिशय घनदाट जंगल असून या जंगलात अनेक विषारी साप आहेत.

Thugs of Hindostan shot extensively in Malta, where Game of Thrones was filmed | ठग्स आॅफ हिंदोस्तानचे चित्रीकरण झाले घनदाट जंगलात, चित्रपटाच्या टीमला या गोष्टींचा करावा लागला सामना

ठग्स आॅफ हिंदोस्तानचे चित्रीकरण झाले घनदाट जंगलात, चित्रपटाच्या टीमला या गोष्टींचा करावा लागला सामना

googlenewsNext

आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित चित्रपट ठग्स आॅफ हिंदोस्तान या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. साहजिकच या चित्रपटाबद्दलची एकही बातमी प्रेक्षक चुकवू इच्छित नाहीत. अशात ठग्स आॅफ हिंदोस्तानचा मेकिंग व्हिडिओ चुकवण्याचा तर प्रश्नच नव्हता. दिवाळीच्या मुहुर्तावर म्हणजे येत्या ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ठग्स आॅफ हिंदोस्तान या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ नुकताच रिलीज करण्यात आला असून या व्हिडिओला प्रेक्षकांचा खूपच छान प्रतिसाद मिळत आहे. हा मेकिंग व्हिडिओ पाहिल्यानंतर या चित्रपटाचे चित्रीकरण कोणत्या परिस्थितीत करण्यात आले याची कल्पना आपल्याला येत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण एका घनदाट जंगलात करण्यात आलेले आहे. या जंगलात चित्रीकरण करणे हे चित्रपटाच्या टीमसाठी खूपच कठीण होते. त्यांना चित्रीकरण करताना अनेक संकटांचा सामना करावा लागला. 

ठग्स आॅफ हिंदोस्तान या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे थायलंडमधील माल्टा या परिसरात झालेले आहे. माल्टा हे अतिशय घनदाट जंगल असून या जंगलात अनेक विषारी साप आहेत. या चित्रपटाचे लोकेशन पाहून अमिताभ बच्चन यांना देखील आश्चर्य वाटले होते. कारण माल्टा येथील या चित्रपटाच्या लोकेशनवर पोहोचल्यावर त्यांना एक महाकाय गुंफा तिथे दिसली होती. ही गुंफा एखाद्या उंच इमारतीप्रमाणेच होती. या गुंफेच्या अवतीभवती या चित्रपटातील अनेक दृश्याचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. या चित्रपटाचे लोकेशन हे आड वळणावर असल्याने तिथे पोहोचणे देखील चित्रपटाच्या टीमसाठी कठीण होते. या लोकेशनवर जाण्यासाठी पायी चालावे लागत असल्याने अमिताभ बच्चन यांना अनेकवेळा श्वसनाचा त्रास व्हायचा. त्यामुळे त्यांना या सेटवर पालखीतून नेले जायचे, असे काही वेबसाईटने आपल्या बातमींमध्ये म्हटले आहे. 

ठग्स आॅफ हिंदोस्तान या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य असून या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबतच आमिर खान, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या लोकेशनच्या आमिर खान तर प्रेमातच पडला होता असे त्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. 

Web Title: Thugs of Hindostan shot extensively in Malta, where Game of Thrones was filmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.