एकाच सिनेमात दिसणार ट्रिपल धमाका! 'टायगर' सोबत फक्त शाहरुखच नाही तर हृतिकचीही एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 11:41 AM2023-11-05T11:41:18+5:302023-11-05T11:42:25+5:30

निर्माता आदित्य चोप्राने त्याच्या यशराज फिल्म्समधून अॅक्शन सिनेमांचा धडाकाच लावला आहे.

tiger 3 latest updates hrithik roshan as kabir from war to do cameo in salman khan s tiger 3 along with pathan as Shahrukh Khan | एकाच सिनेमात दिसणार ट्रिपल धमाका! 'टायगर' सोबत फक्त शाहरुखच नाही तर हृतिकचीही एन्ट्री

एकाच सिनेमात दिसणार ट्रिपल धमाका! 'टायगर' सोबत फक्त शाहरुखच नाही तर हृतिकचीही एन्ट्री

एकाच बिग बजेट सिनेमात जेव्हा एका पेक्षा जास्त स्टार अभिनेते असतात तेव्हा अशा सिनेमाबाबतीत रोज काही ना काही अपडेट्स येत असतात. असाच एक सध्याचा चर्चेतला सिनेमा म्हणजे सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3). 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है'च्या तुफान यशानंतर 'टायगर 3' येत्या दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज होत आहे. विशेष म्हणजे टायगर आता फक्त सलमानपुरता मर्यादित राहिलेला नाही तर सिनेमात दोन सुपरस्टार्सचा कॅमिओ बघायला मिळणार आहे.

निर्माता आदित्य चोप्राने त्याच्या यशराज फिल्म्समधून अॅक्शन सिनेमांचा धडाकाच लावला आहे. याला त्याने स्पाय युनिव्हर्स असं नाव दिलंय. यशराजच्या फिल्म्सच्या 'पठाण' सिनेमात शाहरुख खान मेन लीड होता तर यामध्ये सलमान खानने 'टायगर' भूमिका साकारुन कॅमिओ केला होता. तर आता सलमानच्या 'टायगर 3' मध्ये 'पठाण' म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan)  कॅमिओ करणार हे आधीच समोर आलं होतं. आता नवीन अपडेटनुसार, 'टायगर 3' मध्ये हृतिक रोशनही (Hrithik Roshan) कॅमिओ करताना दिसणार आहे. यशराजच्याच 'वॉर' या अॅक्शन सिनेमात हृतिकने कबीर ही भूमिका साकारली होती. आता हाच कबीर टायगर 3 मध्ये येणार आहे. याद्वारे आदित्या चोप्रा हॉलिवूडप्रमाणेच ही स्वत:ची स्पाय सिरीज बनवत आहे. 

सध्या हृतिकच्या एन्ट्रीबाबत अनेक अंदाज लावले जात आहेत. 'वॉर' मधील व्हिलनच्या मृत्यूचा बदला इम्रान हाश्मी टायगरमध्ये घेणार आहे असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरी दिवाळीच्या मुहुर्तावर चाहत्यांना ट्रिपल धमाका अनुभवायला मिळणार हे नक्की.

१२ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहुर्तावर 'टायगर 3' रिलीज होत आहे. सिनेमात कतरिना कैफ झोया या भूमिकेत दिसणार आहे. हिंदीशिवाय तमिळ आणि तेलुगू मध्येही हा सिनेमा रिलीज होणार आहे. दुसरीकडे शाहरुख खानचा 'डंकी' २२ डिसेंबर ला येतोय. तर हृतिक रोशनचा 'फायटर' आणि 'वॉर 2' रांगेत आहेत. अयान मुखर्जी 'वॉर 2'चे दिग्दर्शन करणार आहे.

Web Title: tiger 3 latest updates hrithik roshan as kabir from war to do cameo in salman khan s tiger 3 along with pathan as Shahrukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.