सलमानच्या 'टायगर ३'ने रिलीज आधीचे केला धमाका, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले कोट्यवधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 12:01 PM2023-11-08T12:01:21+5:302023-11-08T12:05:32+5:30

'टायगर ३'ने प्रदर्शनाआधीच कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या अडव्हान्स बुकिंगला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

tiger 3 salman khan katrina kaif movie earns 10cr from advance booking | सलमानच्या 'टायगर ३'ने रिलीज आधीचे केला धमाका, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले कोट्यवधी

सलमानच्या 'टायगर ३'ने रिलीज आधीचे केला धमाका, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले कोट्यवधी

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या 'टायगर ३'च्या प्रेक्षक प्रतिक्षेत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या दिवाळीतही सलमान चाहत्यांसाठी 'टायगर ३'चं मोठ गिफ्ट घेऊन आला आहे. पहिले दोन भाग सुपरहिट ठरल्यानंतर आता दिवाळीच्या मुहुर्तावर 'टायगर ३' प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये सलमान आणि कतरिना कैफच्या अक्शनची झलक पाहायला मिळाली. ट्रेलरमुळे 'टायगर ३'बाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही धमाका करणार असल्याचं चित्र आहे. 

'टायगर ३'ने प्रदर्शनाआधीच कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ५ नोव्हेंबरपासून टायगरच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. अवघ्या तीन दिवसांतच या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शनाआधीच 'टायगर ३'ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून १० कोटींचा गल्ला जमवला आहे. 

भाईजानचा 'टायगर ३' दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सलमान आणि कतरिना मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलं आहे. इमरान हाशमीदेखील 'टायगर ३'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खानही टायगर ३मध्ये कैमिओ करणार आहे. 
 

Web Title: tiger 3 salman khan katrina kaif movie earns 10cr from advance booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.