'टायगर ३'मध्ये इतक्या मिनिटांचा असणार किंग खानचा कॅमिओ; शोले स्टाईलमध्ये दिसणार सलमान-शाहरुख

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 05:39 PM2023-10-26T17:39:33+5:302023-10-26T17:40:53+5:30

‘पठाण’मध्ये एकत्र झळकल्यानंतर आता पुन्हा सलमान-शाहरुखला एकत्र स्क्रिन शेअर करताना पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. 

Tiger 3: Salman Khan, Shah Rukh Khan To Turn Jai-Veeru From Sholay | 'टायगर ३'मध्ये इतक्या मिनिटांचा असणार किंग खानचा कॅमिओ; शोले स्टाईलमध्ये दिसणार सलमान-शाहरुख

'टायगर ३'मध्ये इतक्या मिनिटांचा असणार किंग खानचा कॅमिओ; शोले स्टाईलमध्ये दिसणार सलमान-शाहरुख

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा सध्या 'टायगर ३' हा चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'टायगर ३' ची चाहते वाट पाहत आहेत. सलमानसोबत या चित्रपटात किंग खान शाहरुखही पाहायला मिळणार आहे. 'टायगर ३' मधील शाहरुखच्या कॅमिओबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे. ‘पठाण’मध्ये एकत्र झळकल्यानंतर आता पुन्हा दोन्ही खानांना एकत्र स्क्रिन शेअर करताना पाहणं ही चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे. 

 'टायगर ३' या चित्रपटात सलमान खानसोबतशाहरुख खानचा खास 15 मिनिटांचा कॅमिओ असणार आहे. कॅमिओचे सीन हे सात दिवस मुंबईत शूट करण्यात आले असल्याची माहिती आहे. हा एक स्टंट सीन असेल. शाहरुख आणि सलमानने यापूर्वी हा सीन मड आयलंडच्या सेटवर शूट केला होता, ज्याची किंमत 30 कोटी रुपये आहे. 

'टायगर 3'मध्ये सलमान खानला खलनायकांनी घेरले असताना शाहरुख खान 'पठाण'च्या भूमिकेत ग्रँड एन्ट्री करणार आहे. रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि सलमान खान 'टायगर 3' मध्ये जय-वीरूचा सीन करणार आहेत. शाहरुख आणि सलमान पाकिस्तान तुरुंगातून पळून जाण्यासाठी शोले स्टाईल मोटरसायकलवर साईडकारसह दिसणार आहेत. शाहरुख मोटारसायकल चालवणार असून सलमान बाजूच्या कारमध्ये बसलेला दिसणार आहे. 

१२ नोव्हेंबर रोजी टायगर ३ प्रदर्शित होणार आहे. त्याची कमालीची उत्सुकता चाहत्यांना आहे. टायगर 3 मधून सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी अनेक वर्षांनंतर थिएटरमध्ये परतत आहे. या दोघांनी आतापर्यंत 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' असे दोन बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. 
 

Web Title: Tiger 3: Salman Khan, Shah Rukh Khan To Turn Jai-Veeru From Sholay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.