Tiger 3 Trailer: देशासाठी नाही तर वैयक्तिक मिशनवर निघाला टायगर, थेट पाकिस्तानात पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:24 PM2023-10-16T12:24:48+5:302023-10-16T12:26:24+5:30

Tiger 3 सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

tiger 3 trailer released salman khan on personal mission to save his family emraan hashmi seen in negative role | Tiger 3 Trailer: देशासाठी नाही तर वैयक्तिक मिशनवर निघाला टायगर, थेट पाकिस्तानात पोहोचला

Tiger 3 Trailer: देशासाठी नाही तर वैयक्तिक मिशनवर निघाला टायगर, थेट पाकिस्तानात पोहोचला

सलमान खानचा (Salman Khan) आगामी 'टायगर 3' (Tiger 3) चा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज झाला आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर टायगर ३ रिलीज होतोय. पहिल्या दोन्ही सिनेमांचं ब्लॉकबस्टर यश पाहता तिसऱ्या भागाकडूनही चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. 'टायगर 3'चा प्रोमो आणि पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. आता सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सच्या या सिनेमाने ट्रेलरमध्येच धुमाकूळ घातला आहे. सलमान खान, कतरिना कैफच्या जबरदस्त स्टंटने लक्ष वेधून घेतलंय.

'टायगर 3' या एक्शन-थ्रिलर सिनेमाचं मनीष शर्मा यांनी दिग्दर्शन केलं आहे. तर आदित्या चोप्राने निर्मिती केली आहे. देशाची रक्षा करण्यासाठी एक्स रॉ एडंट अविनाश सिंह राठोड पुन्हा एकदा मिशनवर निघाल्याचं ट्रेलरमध्ये दिसून येतंय. मात्र यावेळी हे मिशन देशासाठी नाही तर वैयक्तिक बनलं आहे. ज्या टायगरने आपल्या आयुष्याची २० वर्ष देशाच्या रक्षणासाठी घालवली त्यालाच आता गद्दार सिद्ध करण्यात आलंय. तसंच टायगरचं कुटुंबही धोक्यात आहे. त्याचा मुलगा संकटात सापडलेला दिसत आहे. तर व्हिलनच्या भूमिकेत इम्रान हाश्मीच्या डायलॉग्सने लक्ष वेधून घेतलंय. तसंच ट्रेलरच्या शेवटी इम्रान हाश्मी टायगरला 'पाकिस्तानमध्ये स्वागत' असंही म्हणताना दिसतोय.

दिवाळीच्या मुहुर्तावर टायगर 3

'टायगर 3'चा हा दमदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. १२ ऑक्टोबर दिवाळीच्या दिवशीच सिनेमा प्रदर्शित होतोय. त्या दिवशी रविवारही आहे. त्यामुळे या सुट्ट्यांचा सिनेमाला फायदा होणार यात शंका नाही. सिनेमा हिंदी, तेलुगू आणि तमिळ या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. 

Web Title: tiger 3 trailer released salman khan on personal mission to save his family emraan hashmi seen in negative role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.