बॉक्स आॅफिसवर ‘टायगर जिंदा है’चा जोर कायम; ४०० कोटींच्या क्लबमध्ये केली एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 11:45 AM2018-01-03T11:45:07+5:302018-01-03T17:15:07+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा अजूनही बॉक्स आॅफिसवरील जोर कायम असून, ...

Tiger is alive at Box Office; 400 crore club entry entry! | बॉक्स आॅफिसवर ‘टायगर जिंदा है’चा जोर कायम; ४०० कोटींच्या क्लबमध्ये केली एंट्री!

बॉक्स आॅफिसवर ‘टायगर जिंदा है’चा जोर कायम; ४०० कोटींच्या क्लबमध्ये केली एंट्री!

googlenewsNext
लिवूडचा दबंग सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा अजूनही बॉक्स आॅफिसवरील जोर कायम असून, चित्रपटाने आतापर्यंत चारशे कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाने वर्ल्डवाइज ४२३.२९ कोटी रुपयांची कमाई केली असून, बॉक्स आॅफिसवर २८८ कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. ट्रेड एनालिस्ट गिरीश जोहर यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार, चित्रपटाने दहाव्याच दिवशी चारशे कोटी रुपयांची कमाई केली. तर विदेशात या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा पार केला आहे. 

बॉक्स आॅफिसवरील आकड्यांचा विचार केल्यास चित्रपटाने भारतात केवळ दोनच दिवसात ५० कोटी रुपयांची कमाई केली तर तिसºया दिवशी शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले. चौथ्या दिवसापर्यंत चित्रपट १५० कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला होता. पहिला आठवडा संपताच चित्रपटाने २०० कोटी रुपयांची कमाई केली. तर १० व्या दिवशी २५० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. सध्या ‘टायगर’ तीनशे कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविण्यासाठी उत्सुक असून, पुढच्या दोन दिवसामध्ये हा करिश्मा घडून येण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सलमान खानच्या या चित्रपटाने ३०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविल्यास, सलमानचा ३०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविणारा हा तिसरा चित्रपट ठरणार आहे. या अगोदर सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुलतान’ या चित्रपटांनी तीनशे कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले आहे. दरम्यान, ‘टायगर जिंदा है’च्या यशामुळे सलमान खुश असून, त्याने चाहत्यांचे आभार मानले आहे. 

Web Title: Tiger is alive at Box Office; 400 crore club entry entry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.