टायगर जिंदा है नंतर शाहरुख-सलमानला घेऊन अली अब्बासला करायचायं चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 11:34 AM2018-01-12T11:34:11+5:302018-01-12T17:04:11+5:30

सलमान खान सोबत बैक टू बैक दो ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा दिग्दर्शक अली अब्बास जफरला बॉलिवूडच्या दोन खान बरोबर काम ...

Tiger is alive, then Shah Rukh-Salman will be taking the film to Ali Abbas | टायगर जिंदा है नंतर शाहरुख-सलमानला घेऊन अली अब्बासला करायचायं चित्रपट

टायगर जिंदा है नंतर शाहरुख-सलमानला घेऊन अली अब्बासला करायचायं चित्रपट

googlenewsNext
मान खान सोबत बैक टू बैक दो ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा दिग्दर्शक अली अब्बास जफरला बॉलिवूडच्या दोन खान बरोबर काम करायचे. 'टायगर जिंदा है'च्या यशानंतर अली अब्बासचे म्हणणे आहे की, त्याला शाहरुख खान आणि सलमान खानला एकत्र घेऊन कॉमेडी चित्रपट बनावायचा आहे. मात्र स्क्रिप्ट चांगली असली पाहिजे. टायगर जिंदा है ने आतपर्यंत 350 कोटींचा गल्ला जमावला आहे.   
अली अब्बासचा सलमान खानसोबत हा दुसरा चित्रपट होता. याच्या आधी सलमानचा सुल्तान चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांने केले होते. एका इंटरव्ह्रु दरम्यान अलीला शाहरुख खानसोबत काम करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला की, तो दोघांना एकत्र घेऊन कॉमेडी चित्रपट बनवू इच्छितो. पुढे तो म्हणाला की, शाहरुख खान दोघांमध्ये खूप चांगले ट्युनिंग आहे. दोघांनी याआधी चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोघे खूप वेळापासून बॉलिवूडचा हिस्सा आहे. दोघांना एकत्र बघणे प्रेक्षकांना नक्कीच आवडले. 

सध्या शाहरुख आणि सलमान खान आपल्या आपल्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत. सलमान खान रेस 3 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सलमान सोबत डेझी शहा, जॅकलिन फर्नांडिस आणि बॉबी देओल दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसोझा करतो आहे. तर शाहरुख खान झिरोच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त तो एका  बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे.  या चित्रपटातील  शाहरूखची  व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’या चित्रपटात अनेक व्हिज्युअल इफेक्ट्स दिसणार आहेत. शाहरूखची कंपनी रेड चिलीज् व्हीएफएक्सकडे हे काम आहे.शाहरूखच्या या चित्रपटासाठी विदेशातून एक्सपर्ट बोलवले गेलेत, असेही कळतेय.  आनंद एल राय यांच्या या चित्रपटात शाहरूख खानसोबत अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ या दोघी मुख्य भूमिकेत आहेत. यंदा नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला ‘झिरो’ प्रदर्शित होणार आहे.    

Web Title: Tiger is alive, then Shah Rukh-Salman will be taking the film to Ali Abbas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.