Tiger Shroff-Disha Patani Breakup: टायगर श्रॉफ-दिशा पटानीचं ब्रेकअप, ६ वर्षांच्या डेटिंगनंतर संपलं नातं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 12:24 PM2022-07-27T12:24:07+5:302022-07-27T12:34:40+5:30
Tiger Shroff and Disha Patani : टायगर आणि दिशाने त्यांचं नातं कधीच ऑफिशल केलं नाही. 6 वर्षांपासून रिलेशनशिपनंतर दोघांचे ब्रेकअप झालंय.
बॉलिवूड स्टार्स टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि दिशा पटानी(Disha Patani) गेल्या 6 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही अनेकदा इव्हेंटमध्ये एकत्र दिसायचे. अनेकदा दोघेही मालदीवमध्ये जाऊन एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करायचे. मात्र, दोघेही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलले नाहीत. रिपोर्टनुसार 6 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघे वेगळे झाले आहेत.
टायगर आणि दिशाचे रस्ते झाले वेगळे
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे बॉलिवूडमधील आवडत्या कपलपैकी एक आहेत. त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. पण आता दिशा आणि टायगर जोडी म्हणून एकत्र दिसणार नाहीत. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार टायगर आणि दिशा यांच्या नात्यात गेल्या एक वर्षापासून बरेच चढ-उतार आले होते. पण या दोघांनी कोणतीच गोष्ट जगजाहीर नाही केली.
दिशा आणि टायगरने वेगळे होण्याचा निर्णय का घेतला याचे खरे कारण समोर आलेले नाही.हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना टायगरच्या एका मित्राने दोघांच्या ब्रेकअपची बातमी खरी असल्याचे सांगितले आहे. टायगरच्या मित्राचे म्हणणे आहे की, ब्रेकअपमुळे टायगरला त्याच्या कामात काही फरक पडू दिला नाही. तो पूर्वीप्रमाणेच आपल्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसतो. टायगर सध्या लंडनमध्ये त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दिशा पटानी 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये दिसणार आहे. त्याचवेळी टायगर श्रॉफ 'गणपत' आणि 'बागी-4'मध्ये झळकणार आहे. दिशा आणि टायगर आता कपल म्हणून एकत्र नसले तरी त्यांची मैत्री अजूनही कायम आहे.