बॉलिवूडमधील या प्रसिद्ध कपलने केले ब्रेकअप?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 06:38 PM2019-06-24T18:38:44+5:302019-06-24T18:46:24+5:30
बॉलिवूडमधील हे कपल प्रचंड प्रसिद्ध असून त्यांच्या फॅन्सना त्यांची जोडी खूप आवडते.
एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातून दिशा पटानीने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्याआधी 'लोफर' या तेलुगू सिनेमातून दिशाने अभिनयाची इनिंग सुरू केली होती. धोनी या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली आणि त्यानंतर जॅकी चॅनसह 'कूंग फू योगा' या सिनेमातही दिशाने काम केलं होतं. 'बागी-२' या सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळाली होती. 'बागी-२' मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना प्रचंड भावली होती.
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून ऐकायला मिळत आहे. दिशा आणि टायगर कधी लंच डेटवर जातात तर कधी पार्टींमध्ये एकत्र दिसतात. दिशाच्या भारत या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या प्रिमियरला देखील टायगर आणि दिशा एकत्र दिसले होते. पण दिशाने नेहमीच त्यांच्या नात्याबाबत मौन राखणेच पसंत केले आहे. पण दिशा आणि टायगर यांच्या फॅन्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे.
पिंकव्हिलाने दिलेल्या बातमीनुसार, टायगर आणि दिशा यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून बिनसले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी आता ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. त्या दोघांनी संगनमताने ब्रेकअप केले असून त्या दोघांमध्ये कित्येक महिन्यांपासून काही प्रॉब्लेम सुरू होते. त्या दोघांनी ते मिटवण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण प्रियकर-प्रेयसीपेक्षा एकमेकांचे चांगले फ्रेंड्सच राहणे त्यांना योग्य वाटत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ते दोघे फ्रेंडशिप कायम ठेवणार असून त्या दोघांना नुकतेच एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना देखील एकत्र पाहाण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान टायगरने त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, सेलिब्रेटींच्या आयुष्याची चर्चा नेहमीच सगळीकडे सुरू असते. त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची इच्छा सगळ्यांना असते हे मला माहिती आहे. त्यामुळे दिशा आणि माझ्याकडे लोकांचे जास्तच लक्ष असते. आम्ही दोघे एकत्र खूप धमाल मस्ती करतो आणि एकमेकांची कंपनी एन्जॉय करतो. त्यामुळे या सगळ्या चर्चेचा आमच्या मैत्रीवर कधीही परिणाम होत नाही.