अरे बापरे....! सेटवर टायगर श्रॉफला तारा व अनन्या या गोष्टीसाठी करावी लागायची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 06:00 AM2019-04-29T06:00:00+5:302019-04-29T06:00:00+5:30

करण जोहर निर्मित व पुनित मल्होत्रा दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे.

Tiger Shroff and Tara Sutariya, Ananya's Student of the year 2 release on 10th may | अरे बापरे....! सेटवर टायगर श्रॉफला तारा व अनन्या या गोष्टीसाठी करावी लागायची विनंती

अरे बापरे....! सेटवर टायगर श्रॉफला तारा व अनन्या या गोष्टीसाठी करावी लागायची विनंती

googlenewsNext


करण जोहर निर्मित व पुनित मल्होत्रा दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तेव्हापासून या सिनेमाच्या चर्चेला उधाण आले आहे. या चित्रपटातून अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेतारा सुतारिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि त्यांच्यासोबत बॉलिवूडचा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत झळकणार आहे.  

या चित्रपटाबाबत टायगर खूप उत्सुक असून तो म्हणाला की, ''स्टुडंट ऑफ द ईयर' चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्यातील कलाकारांचेदेखील खूप कौतूक झाले होते. त्यामुळे आता या चित्रपटाच्या सीक्वेलला रसिक कसा रिस्पॉन्स देतात, हे पाहावे लागेल. त्यामुळे स्टुडंट ऑफ द ईयर २ बाबत मी खूप उत्सुक आणि नर्व्हसदेखील आहे. 'स्टुडंट ऑफ द ईयर २' हे एक वेगळे जग आहे. पहिल्या भागात पाहिलेले कॉलेज तुम्हाला पहायला मिळणार आहे. कथानक, पात्र व स्पोर्ट्स वेगळे पहायला मिळणार आहे.'


तारा व अनन्या या दोघीही या चित्रपटातून पदार्पण करत आहेत.

त्यामुळे सेटवर शूटिंगवेळी या दोघींपैकी जास्त टेक्स कोण घ्यायचे, असे विचारल्यावर टायगर म्हणाला की, मीच जास्त टेक्स घेतो. कारण मला कधीच शूटिंगवेळी संतुष्ठी मिळत नाही. त्यामुळे मला चांगल्यातील चांगला शॉट हवा असायचा. त्यामुळे मी त्या दोघींना खूप त्रास द्यायचो आणि आणखीन एक टेक घेऊ द्या अशी विनंती करायचो. 


करण जोहर निर्मित व पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमा १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Tiger Shroff and Tara Sutariya, Ananya's Student of the year 2 release on 10th may

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.