क्या बात है भिडू! टायगर श्रॉफनं मुंबईतील महागड्या भागात घेतलं नवं घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 12:15 IST2021-08-24T12:15:03+5:302021-08-24T12:15:46+5:30
मुंबईच्या खार वेस्ट भागात बॉलिवूडचे अनेक बडे सेलिब्रिटी राहतात. या ठिकाणी घर हे प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटीचं स्वप्न असतं. टायगरचं हे स्वप्नं अखेर पूर्ण झालं आहे.

क्या बात है भिडू! टायगर श्रॉफनं मुंबईतील महागड्या भागात घेतलं नवं घर
जॅकी श्रॉफचा ( Jackie Shroff ) लेक अभिनेता टायगर श्रॉफ ( Tiger Shroff ) नव्या घरात शिफ्ट झाला आहे. होय, मुंबईतील सर्वात महागड्या भागात टायगरने एक अलिशान घर खरेदी केलं आहे. सध्या त्याच्या याच घराची चर्चा आहे. मुंबईच्या खार वेस्ट भागात बॉलिवूडचे अनेक बडे सेलिब्रिटी राहतात. या ठिकाणी घर हे प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटीचं स्वप्न असतं. टायगरचं हे स्वप्नं अखेर पूर्ण झालं आहे.
खार वेस्ट येथील रुस्तमजी पॅरामाउंट येथे त्यानं घर घेतलं आहे. टायगच्या या 8 बीएचके घरात जिम आहे, गेस्ट रूम आहे, स्वीमिंग पूल, आर्टिफिशिअल रॉक क्लायम्बिंगसारख्या अनेक गोष्टी आहेत. शिवाय या घरातून अरबी समुद्राचा सुंदर नजारा दिसतो.
टायगर लवकरच या नव्या घरात शिफ्ट झाला आहे. त्याचे आई वडील जॅकी श्रॉफ, आयशा श्रॉफ आणि बहीण कृष्णा श्रॉफ देखील त्याच्यासोबत राहत आहेत. श्रॉफ कुटुंब पूर्वी कार्टर रोड येथील एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहायचं. पण आता आता टायगरने नवीन 8 बेडरुम्सचं घर खरेदी केलं म्हटल्यावर संपूर्ण कुटुंब आता इथे शिफ्ट झालं आहे. या घराचा कोपरा न कोपरा शानदार आहे. अगदी फाईव्ह स्टार हॉटेलसारखा लुक असलेले हे घर अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आले आहे.
या कॉम्प्लेक्समध्ये राणी मुखर्जी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, मेघना घई पुरी, दिशा पाटनी यांसारख्या सेलब्रिटींनीही घर घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ‘बागी 3’ या सिनेमात तो अखेरचा दिसला होता. लवकरच ‘बागी 4’ या सिनेमात तो दिसणार आहे. याशिवाय ‘गणपत’ हा त्याचा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकताच या सिनेमाचा नवा टीजर रिलीज झाला होता.