टायगर श्रॉफ त्याच्या बहिणीसोबत मिळून करतोय हे काम, ऐकल्यानंतर तुम्ही कराल दोघांची प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 07:15 AM2018-12-01T07:15:00+5:302018-12-01T07:15:00+5:30

टायगर श्रॉफसाठी २०१८ वर्ष खूप चांगले ठरले. वर्षाच्या सुरूवातीला बागी २ यशस्वी ठरल्यानंतर टायगरने स्टुडंट ऑफ द इयरच्या चित्रीकरणाला सुरूवात केली.

Tiger Shroff is doing his work together with his sister | टायगर श्रॉफ त्याच्या बहिणीसोबत मिळून करतोय हे काम, ऐकल्यानंतर तुम्ही कराल दोघांची प्रशंसा

टायगर श्रॉफ त्याच्या बहिणीसोबत मिळून करतोय हे काम, ऐकल्यानंतर तुम्ही कराल दोघांची प्रशंसा

googlenewsNext
ठळक मुद्देटायगर व कृष्णा सुरू करणार जिमभाऊ-बहिण लवकरच सुरू करणार जिमटायगर आपल्या फिटनेसबाबत आहे जागरूक

अभिनेता टायगर श्रॉफसाठी २०१८ हे वर्ष खूप चांगले ठरले. या वर्षाच्या सुरूवातीला बागी२ प्रदर्शित झाला व या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर टायगरने आगामी चित्रपट स्टुडंट ऑफ द ईयर२च्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. तसेच टायगर त्याची बहीण कृष्णा श्रॉफसोबत मिळून एमएमए मॅट्रीक्स जिम सुरू करणार आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये माहिर असलेला टायगर कृष्णासोबत आज (१ डिसेंबर) वांद्रे येथे एमएमए मान्यता प्राप्त जिम सुरू करणार आहे.
टायगर श्रॉफ फक्त दमदार डान्ससाठी ओळखला जात नाही तर त्याच्या फिट शरीरयष्टीसाठी व अॅक्शन सीनसाठी ओळखला जातो. त्याला मुलाखतीत आणि त्याचे चाहते त्याला मिक्स्ड मार्शल आर्ट्स कुठून शिकला आहे. टायगर श्रॉफच्या जवळच्या व्यक्तीकडून समजले की टायगरला मिक्स्ड मार्शल आर्ट्स कुठून शिकला आहे, हे वारंवार विचारले जाते. त्यामुळे त्याने त्यावेळी
मिक्स्ड मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय लवकरच पूर्ण होत आहे. 


टायगर म्हणाला की, कृष्णा व मी मिक्स्ड मार्शल आर्ट्सबाबत पॅशनेट आहोत आणि हे प्रशिक्षण केंद्र आम्ही दोघे मिळून सुरू करत आहोत. 
टायगरने हृतिक रोशनसोबत सिद्धार्थ आनंदचा आगामी अॅक्शन चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. टायगर पहिल्यांदाच हृतिक सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

Web Title: Tiger Shroff is doing his work together with his sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.