टायगर श्रॉफसोबत श्रीलंका येथे हॉलिडे एन्जॉय करीत आहे दिशा पटानी; व्हाइट बिकिनीतील फोटो केला शेअर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 12:37 PM2017-12-30T12:37:58+5:302017-12-30T18:34:21+5:30

अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा पटानी सध्या श्रीलंका येथे हॉलिडे एन्जॉय करत आहेत. यावेळी दिशाने तिचा एक बिकिनीतील फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.

Tiger Shroff is enlightening the holiday in Sri Lanka with Patna; Share photos of White Bikini! | टायगर श्रॉफसोबत श्रीलंका येथे हॉलिडे एन्जॉय करीत आहे दिशा पटानी; व्हाइट बिकिनीतील फोटो केला शेअर!

टायगर श्रॉफसोबत श्रीलंका येथे हॉलिडे एन्जॉय करीत आहे दिशा पटानी; व्हाइट बिकिनीतील फोटो केला शेअर!

googlenewsNext
िनेत्री दिशा पटानी बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत श्रीलंकेत हॉलिडे एन्जॉय करीत आहे. दिशा नेहमीच तिच्या डे टू डे लाइफची माहिती तिच्या चाहत्यांशी शेअर करीत असते. नुकतेच तिने तिच्या या व्हॉलिडेचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यामध्ये ती अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे. दिशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बीचवर अतिशय रिलॅक्स मुडमध्ये दिसत आहे. फोटोत दिशा व्हाइट बिकिनीमध्ये दिसत असून, तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांकडून पसंत केला जात आहे. 



सध्या दिशा ‘बागी-२’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिचा बॉयफ्रेंड टायगर तिच्या अपोझिट असून, २०१६ मध्ये आलेल्या टायगरच्या ‘बागी’चा हा दुसरा भाग आहे. या चित्रपटाला अहमद खान दिग्दर्शित करीत आहेत, तर साजिद नाडियाडवाला निर्माता म्हणून काम करीत आहेत. दरम्यान, दिशा अखेरीस ‘कुंग फू योगा’मध्ये अभिनेता जॅकी चॅन याच्यासोबत झळकली होती. त्याचबरोबर ‘धोनी : द अनटोल्ड स्टोरी’मध्ये ती सुशांत सिंग राजपूत याच्या अपोझिट होती. या चित्रपटातील दिशाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले गेले. 
 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई येथून श्रीलंकेला रवाना होण्याअगोदरच दिशा आणि टायगरचे काही फोटोज् समोर आले. ज्यामध्ये टायगर आणि दिशाची केमिस्ट्री दिसून येत होती. जेव्हा हे दोघे श्रीलंकेला जात होते तेव्हा त्यांची भेट अभिनेता रणवीर सिंग याच्याबरोबर झाली होती. यावेळी टायगरने रणवीरला त्याच्या शेजारील सीट आॅफर केली अन् तो दिशाच्या जवळ जाऊन बसला. टायगर आणि दिशा सुरुवातीला त्यांच्यातील नात्याविषयी फारसे बोलत नव्हते. परंतु ज्यापद्धतीने गेल्या काही दिवसांपासून ते एकत्र दिसत आहेत, त्यावरून ते नक्कीच रिलेशनशिपमध्ये असावेत असे बोलले जात आहे. 

Web Title: Tiger Shroff is enlightening the holiday in Sri Lanka with Patna; Share photos of White Bikini!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.