शूटींगदरम्यान टायगर श्रॉफच्या डोळ्याला लागला मार, फोटो बघून चाहत्यांची वाढली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 02:30 PM2021-12-22T14:30:19+5:302021-12-22T14:37:45+5:30
चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान टायगर (Tiger shroff)च्या डोळ्याला दुखापत झाल्याचे पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger shroff) त्याच्या गणपत पार्ट 1 चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. टायगरने डोळ्याला झालेल्या दुखापतीचा फोटो इन्स्टावर शेअर केला आहे.
शूटिंगच्या सेटवर टायगर श्रॉफच्या डोळ्याला झाली दुखापत
टायगर (Tiger shroff) ने इन्स्टा स्टोरीवर जखमी डोळ्याचा फोटो शेअर करत लिहिले – Shit happens #ganapath final countdownnn. टायगर श्रॉफ ( (Tiger shroff) च्या एका डोळ्याला झालेली दुखापत फोटोत स्पष्टपणे दिसतं आहे. त्याचा डोळा सुजला आहे, डोळ्यात काळ्या-निळ्या रंगाच्या खुणा दिसतात. अभिनेत्याचा हा फोटो पाहिल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले आहेत. अभिनेता लवकर बरा व्हावा यासाठी ते प्रार्थना करत आहेत.
टायगर श्रॉफशिवाय या चित्रपटात क्रिती सेनॉन आणि एली अवराम दिसणार आहेत. रिपोर्टनुसार गणपत पार्ट 1 चित्रपटाच्या निर्मात्यांना टायगर श्रॉफच्या वडिलांच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना कास्ट करायचे होते. या चित्रपटात टायगर बॉक्सरची भूमिका साकारत आहे. त्याच्या वडिलांचे पात्रही बॉक्सर म्हणून दाखवले जाणार आहे. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना अद्याप कास्ट करण्यात आलेले नाही. बिग बींनी अद्याप हा चित्रपट साईन केलेला नाही.
'गणपत' या चित्रपटात टायगर आणि क्रितीची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. टायगर आणि क्रितीने बॉलिवूडचा प्रवास एकत्र सुरू केल्याचे सर्वांनाच माहीत आहे. हिरोपंती हा दोघांचा डेब्यू चित्रपट होता. 'हिरोपंती'नंतर 'गणपत'मध्ये दोघेही दुसऱ्यांदा एकत्र दिसणार आहेत. टायगर श्रॉफचा हिरोपंती 2 हा चित्रपटही सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात टायगरसोबत क्रिती नाही तर तारा सुतारिया दिसणार असल्याची चर्चा आहे.