'अपनों पर बात आती है, तो अपन की हट जाती है', 'गणपत' चित्रपटाचा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 01:58 PM2023-09-29T13:58:25+5:302023-09-29T14:05:29+5:30

'गणपत' चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला आहे. सोशल मिडीयावर गणपतच्या टीझरची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Tiger Shroff, Kriti Sanon's 'Ganapath' teaser release | 'अपनों पर बात आती है, तो अपन की हट जाती है', 'गणपत' चित्रपटाचा टीझर रिलीज

Tiger Shroff, Kriti Sanon's 'Ganapath' teaser release

googlenewsNext

बॉलिवूडमधील अ‍ॅक्शन स्टार टायगर श्रॉफचा बहुप्रतिक्षित चित्रपट या दसऱ्याला म्हणजेच 20 ऑक्टोबरला सिनेमा प्रदर्शित होईल. चाहते चित्रपटाबद्दल खूप उत्सुक प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. यातच 'गणपत' चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला आहे. सोशल मिडीयावर गणपतच्या टीझरची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

गणपतच्या टीझरची सुरुवात ही २०७० सालात टायगर श्रॉफ ध्यान करायला बसलेला दिसणयापासून होते. यात पुढे  टायगर फाईटर म्हणून रिंगमध्ये बॉक्सिंग करताना दिसतो. तर एका वेगळ्याच  लूकमध्ये अमिताभ बच्चन पाहायला मिळत आहेत. तर एकूणच अ‍ॅक्शन आणि रोमान्सचा तडका असलेल्या गणपतचा टीझर एका अनोख्या टेक्नोलॉजीकल दुनियेची सफर घडवून आणतो.

'गणपत'  हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा एक पॅन इंडिया सिनेमा आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये सिनेमा जगभरात प्रदर्शित होईल.  टायगर श्रॉफ आणि कृती सेनन या सिनेमाच्या माध्यमातून ते नऊ वर्षांनी एकत्र काम करत आहेत. याआधी 'हीरोपंती' या सिनेमात ते एकत्र झळकले होते. 'हीरोपंती' हा दोघांचाही पहिला सिनेमा होता. 

टायगर श्रॉफने 2012 साली हिरोपंती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता.  ‘बागी’, ‘फ्लाइंग जट्ट’, ‘मुन्ना मायकल’, ‘बागी 2’, ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’, ‘वॉर’, ‘बागी 3’, ‘हिरोपंती 2’ या चित्रपटांत त्याने मुख्य भूमिका साकारली आहे. टायगर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Web Title: Tiger Shroff, Kriti Sanon's 'Ganapath' teaser release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.