VIDEO: रिलीज होताच सोशल मीडियात रंगली टायगर श्रॉफने गायलेलं गाणं 'Unbelievable'ची चर्चा...
By अमित इंगोले | Published: September 22, 2020 04:08 PM2020-09-22T16:08:37+5:302020-09-22T16:11:16+5:30
टायगरने लॉकडाऊन सुरू असताना स्टुडिओत आपल्या आवाजावर मेहनत घेतली आणि सोबतच म्युझिक व्हिडिओही शूट केला.
दोन आठवड्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर अभिनेता टायगर श्रॉफचं 'अनबिलीवेबल (Unbelievable)' गाणं रिलीज झालंय. टायगरने पॉप-कल्चर आउटफिट, बिग बॅग म्युझिकसोबत हे गाणं केलंय. लॉकडाऊनमध्ये अनेकांप्रमाणे टायगरनेही नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. ज्यात यशस्वी झाल्याचा दिसतोय. टायगरने लॉकडाऊन सुरू असताना स्टुडिओत आपल्या आवाजावर मेहनत घेतली आणि सोबतच म्युझिक व्हिडिओही शूट केला.
गाणं आणि म्युझिकबाबत आपले विचार सांगताना टायगर म्हणाला की, 'मला नेहमीच स्वत:च्या गाण्यावर डान्स करायचा होता आणि अखेर मला तसं करण्याची संधी मिळाली. मी हा प्रवास सुरू करण्यासाठी फार उत्साही आहे. शिकण्यासाठी खूप काही आहे'. गेल्याच आठवड्यात या गाण्याचं इंट्रोडक्शन रिलीज करण्यात आलं होतं. ज्यात टायगरने सांगितले होते की, कशाप्रकारे तो मोठा होताना मायकल जॅक्सनपासून प्रभावित झाला होता आणि कशाप्रकारे त्याने त्याच्या संवेदनांना आकार दिला.
टायगर या गोष्टीचं उदाहरण आहे की, तुम्ही तुमच्या जीवनात अविश्वसनिय गोष्टी कशाप्रकारे मिळवू शकता. जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी कठोर मेहनत घेत नाहीत. तोपर्यंत काही मिळत नाही. कोरोना काळात आपल्या फॅन्सना प्रोत्साहित करण्यासाठी टायगरने सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #YouAreUnbelievable चॅलेंजची सुरूवात केली होती. ज्याद्वारे तुम्ही जगासमोर तुमचं टॅलेंट दाखवू शकाल.