टायगर श्रॉफच्या मम्मीने राम गोपाल वर्माला म्हटले कुत्रा; बहीण आणि पप्पा जॅकी श्रॉफनेही केला पलटवार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2017 08:46 AM2017-04-13T08:46:22+5:302017-04-13T14:17:02+5:30
वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा गेल्या काही दिवसांपासून अभिनेता टायगर श्रॉफ याला चांगलेच टार्गेट करीत ...
व दग्रस्त ट्विट करून चर्चेत राहणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा गेल्या काही दिवसांपासून अभिनेता टायगर श्रॉफ याला चांगलेच टार्गेट करीत असल्याचे दिसत आहे. यावेळेस तर त्यांनी टायगरला चक्क ‘ट्रान्सजेंडर’ म्हणून संबोधले. मात्र त्यांचा हा आरोप त्यांच्या चांगलाच अंगलट असून, टायगर श्रॉफच्या मम्मी आयशा श्रॉफने त्यांना असं काही सुनावलं की, रामूला अखेर या संपूर्ण प्रकाराविषयी टायगरची माफी मागावी लागली.
काही दिवसांपूर्वीच राम गोपाल वर्मा यांनी टायगर श्रॉफला ट्रान्सजेंडर असे संबोधले होते. मात्र त्यांचा हा दावा तेव्हा उघड झाला जेव्हा अभिनेता विद्युत जामवाला याने रामूची पोलखोल केली. त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी रामूने ट्विट करीत म्हटले होते की, ‘जर टायगर श्रॉफ आणि विद्युत जामवाला यांच्यात फाइट झाल्यास विद्युत हारणार’. जेव्हा ही बाब टायगरच्या लक्षात आली तेव्हा त्याने थेट राम गोपाल वर्मा यांना कॉल केला. दोघांच्या संभाषणादरम्यान रामूने टायगरविषयी अपशब्दांचा वापर केला होता. विद्युतची समजूत काढताना राम गोपाल वर्मा यांनी टायगरला ट्रान्सजेंडर असे म्हटले.
परंतु हे प्रकरण येथेच थांबले नाही. विद्युतने राम गोपाल वर्मा आणि त्याच्यातील सर्व रेकॉर्डेड संभाषण ट्विटरवर शेअर केले. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. परंतु अशातही रामूच्या या उथळ वक्तव्यावर टायगरने पलटवार केला नाही. मात्र टायगरच्या मम्मी आणि बहिणीला मात्र रामूचा हा उथळपणा चांगलाच जिव्हारी लागला. त्यांनी लगेचच रामूवर पलटवर करीत त्यांची तुलना चक्क कुत्र्याशी केली. ‘कुत्रे भुंकतच असतात, त्यामुळे त्याचा काहीही परिणाम होत नसतो’ असे टायगरच्या मम्मीने म्हटले, तर टायगरची बहीण कृष्णाने म्हटले की, ‘मला माझ्या भावावर गर्व आहे, त्याने लोकांवर छाप सोडली आहे.’ तर टायगरचे पप्पा जॅकी श्रॉफने म्हटले की, ‘यावर मी काय बोलायला हवे, काही लोक माझ्या मुलाविषयी ऐवढे प्रभावित झाले आहेत की, कामे सोडून केवळ माझ्या मुलावर कमेंट करीत असतात’.
आता टायगरच्या परिवारातील सर्वच रामूवर तुटून पडल्याने त्यांना माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी लगेचच टायगर आणि विद्युतची माफी मागून यासर्व प्रकरणावर पडद्या टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र माफीने हे प्रकरण थांबणार आहे का? की ही आगामी काळातील वादळांची नांदी तर नव्हे ना? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. राम गोपाल वर्मा यांच्या ‘सरकार-३’ या आगामी चित्रपटात जॅकी श्रॉफ यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अशात हा वाद पुन्हा उफाळून आल्यास नवल वाटू नये.
Though it was done in my usual fun way,I apologise to both @VidyutJammwal and @iTIGERSHROFF for the irritation caused— Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 11, 2017}}}} ">http://
}}}} ">Though it was done in my usual fun way,I apologise to both @VidyutJammwal and @iTIGERSHROFF for the irritation caused— Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 11, 2017
Though it was done in my usual fun way,I apologise to both @VidyutJammwal and @iTIGERSHROFF for the irritation caused— Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 11, 2017