Screw Dheela Shelved: टायगर श्रॉफनं करण जोहरकडे मागितली भरमसाठी फीस? निर्मात्यावर आली चित्रपट बंद करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 12:03 PM2022-11-09T12:03:11+5:302022-11-09T12:04:01+5:30

महामारी आणि मंदीनंतर कोणताही निर्माता कलाकाराला ऐवढी फीस घेऊ शकत नाही. पण टायगरनं फीसमध्ये कोणतीही तोडजोड करण्यास स्पष्ट नकार दिला.

Tiger Shroffs screw dheela shelved here is the reason why Karan Johar calls it off | Screw Dheela Shelved: टायगर श्रॉफनं करण जोहरकडे मागितली भरमसाठी फीस? निर्मात्यावर आली चित्रपट बंद करण्याची वेळ

Screw Dheela Shelved: टायगर श्रॉफनं करण जोहरकडे मागितली भरमसाठी फीस? निर्मात्यावर आली चित्रपट बंद करण्याची वेळ

googlenewsNext

Tiger Shroff's Screw Dheela Shelved: करण जोहरने काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफसोबत त्याच्या बिग बजेट अ‍ॅक्शन एन्टरटेनरची घोषणा केली. मात्र, यानंतर याबाबत फारशी चर्चा न झाल्यानं हा प्रोजेक्ट पुढे ढकलण्यात आल्याची अफवा पसरली. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, करण जोहरचा हा चित्रपट ठंड बस्त्यात गेला आहे. टायगर श्रॉफने मागितलेली भरमसाठ फी हे त्यामागचे कारण सांगितले जात आहे. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की टायगरने या चित्रपटासाठी मागितलेले मानधन करण जोहरला मान्य नव्हते.

असे म्हटले जात आहे की करण जोहर 'स्टुडंट ऑफ द इयर 2' नंतर टायगरसोबत फुल-ऑन अॅक्शन चित्रपटासाठी खूप उत्सुक होता. टायगरला देखील अ‍ॅक्शन चित्रपट करण्यासाठी उत्सुक होता त्यामुळे त्याला करणशी पैशांबाबत कोणतीच चर्चा करायची नव्हती. मात्र, काही दिवसांनी टायगरच्या टीमने करणला 30 कोटी मानधन मागितले. 

रिपोर्टनुसार करणनं टायगरच्या टीमला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की महामारी आणि मंदीनंतर कोणताही कलाकार ऐवढी फीस घेऊ शकत नाही. पण टायगरच्या टीमकडून सांगण्यात आले की तो चित्रपट कमी मानधनात करणार नाही, त्यामुळे करणकडे प्रोजेक्ट रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता. तथापि, चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाबद्दल अधिकृत अपडेट दिलेली नाही. 

Web Title: Tiger Shroffs screw dheela shelved here is the reason why Karan Johar calls it off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.