दिशा पटानीच्या लेटेस्ट फोटोचा सोशल मीडियावर बोलबोला, टायगर श्रॉफच्या बहिणीनेही केली कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 12:10 IST2020-11-26T12:09:51+5:302020-11-26T12:10:27+5:30
दिशा पटानीचा मालदीव व्हॅकेशनचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

दिशा पटानीच्या लेटेस्ट फोटोचा सोशल मीडियावर बोलबोला, टायगर श्रॉफच्या बहिणीनेही केली कमेंट
दिशा पटानीच्या लेटेस्ट फोटोचा सोशल मीडियावर बोलबोला, टायगर श्रॉफच्या बहिणीनेही केली कमेंट
लॉकडाउननंतर बॉलिवूड सेलिब्रेटी मालदिवला व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. बॉलिवूड टाउनचे कित्येक सेलिब्रेटी हॉलिडेसाठी बीच आयलंडवर आले आहेत आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहेत. नुकतेच दिशा पटानीने मालदीवचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिने व्हाइट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
दिशा पटानीच्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. तिच्या या फोटोवर टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने देखील कमेंट केली आहे. तिने या फोटोवर क्यूट अशी कमेंट केली आहे. दिशा आणि कृष्णा या दोघींमध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे. ते नेहमी एकमेकांच्या फोटो व व्हिडीओवर कमेंट करत असतात.
यापूर्वी दिशा कृष्णाची मेकअप आर्टिस्ट बनली होती. खरेतर कृष्णाने आपला एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसत होती. दिशाने फोटो शेअर करत सांगितले होते की तिचा मेकअप दिशाने केला आहे.
कृष्णा श्रॉफच्या या फोटोवर दिशाने कमेंट केली की, ब्युटी. त्यावर कृष्णाने उत्तर दिले की, त्यासाठी धन्यवाद.
दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती सलमान खानची मुख्य भूमिका असलेला चित्रपट राधेमध्ये झळकणार आहे. राधे या सिनेमात सलमान व दिशा रोमान्स करताना दिसणार आहे. लॉकडाऊनमुळे या सिनेमाचे शूटींग खोळंबले होते. पण तब्बल साडेसहा महिन्यांनी शूटींग पुन्हा सुरु झाली आहे. तर टायगर श्रॉफ बागी ४ आणि हिरोपंती २ चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात करणार आहे.