टायगरच्या बहिणीने इंस्टाग्रामवरून डिलीट केले बॉयफ्रेंडचे फोटो, नात्यात आली कटुता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 19:36 IST2020-04-06T19:34:29+5:302020-04-06T19:36:44+5:30
टायगरची बहीण कृष्णा श्रॉफ हिने सोशल मीडियावरील बॉयफ्रेंडसोबतचे सर्व फोटो डिलीट केले आहेत.

टायगरच्या बहिणीने इंस्टाग्रामवरून डिलीट केले बॉयफ्रेंडचे फोटो, नात्यात आली कटुता?
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत येत असते. कृष्णाला फिरायला खूप आवडतं आणि तिला बीचवर फिरायला जास्त आवडते.
कृष्णा श्रॉफ बॉलिवूडमध्ये सक्रीय नसली तरी तिचे सोशल मीडियावर फॉलोव्हर्सची संख्या खूप आहे. ती सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते.
कृष्णा श्रॉफला तिच्या चाहत्याने तिच्या टॅटूबद्दल विचारले आहे. त्यावर कृष्णाने इंस्टावर उत्तर देताना सांगितले की, तिचे टॅटू कमी झाले आहे. सध्या तिच्या इंस्टाग्राम अकाउंट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
यामागचे कारण म्हणजे कृष्णा श्रॉफने बॉयफ्रेंड एबन होम्ससोबतचे सर्व फोटो व व्हिडिओ डिलिट केले आहेत. याआधी नेहमी ती एबनसोबतचे फोटो व व्हिडिओ शेअर करत होती. त्यामुळे त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसली असल्याचे बोलले जात आहे.
कृष्णाने फोटो का हटविले याबाबत अद्याप तिच्याकडून कोणतेही विधान समोर आलेले नाही. मात्र डिलीट उगाच तिने केलं नसेल. यामागचं कारण जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
कृष्णाचे चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणाची वाट पाहत आहेत. मात्र तिने बॉलिवूडमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. ती फिटनेस फ्रीक असून वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.