भाचीसोबत चालत्या रेल्वेत छेडछाड, ‘हेल्पलाईन’वर भडकले तिग्मांशू धुलिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 11:09 AM2020-01-27T11:09:19+5:302020-01-27T11:10:49+5:30
महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सरकारचे दावे किती पोकळ आहेत, हे प्रत्यक्षात मदतीची वेळ आली की सिद्ध होते. बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांना अलीकडे याचा प्रत्यय आला.
महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सरकारचे दावे किती पोकळ आहेत, हे प्रत्यक्षात मदतीची वेळ आली की सिद्ध होते. बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांना अलीकडे याचा प्रत्यय आला. ट्रेनमधून प्रवास करणाºया भाचीसाठी त्यांनी मदत मागितली. मदतीसाठी हेल्पलाईन नंबर्स मिळवले. पण त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी ट्वीटरवरून लोकांना मदतीची याचना करावी लागली.
My niece is travelling in udyan express to Banglore berth B3 she is being harassed by four drunk boys no helpline numbers are responding and she is scared can someone help
— Tigmanshu Dhulia (@dirtigmanshu) January 26, 2020
तिग्मांशू यांची भाची 26 जानेवारीला उद्यान एक्स्प्रेसने बेंगळुरूला निघाली होती. याचदरम्यान नशेत तर्र असलेल्या चार भामट्यांनी तिची छेड काढली. या घटनेनंतर तिग्मांगू यांनी ट्वीट करत लोकांची मदत मागितली. ‘माझी भाची उद्यान एक्स्पेसने बेंगळुरूला जात आहे. ती बी-3 बर्थवर आहे. नशेत तर्र असलेल्या चार जणांनी तिच्यासोबत छेडछाड केली. ती घाबरलेली आहे. काय कुणी मदत करू शकते?’, असे ट्वीट त्यांनी केले. हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला न गेल्यामुळे अखेर त्यांनी ट्वीट करून मदतीची याचना केली.
Thank you all for responding I am really great full no help line numbers worked but eventually like in india Jugaad kiya and cops came she is safe now thanks again guys 🙏
— Tigmanshu Dhulia (@dirtigmanshu) January 26, 2020
तासाभरानंतर तिग्मांशूने दुस-यांदा ट्वीट करत मदत करणा-यांचे आभार मानले. पोलिसांचेही त्याने आभार मानले. सोबत हेल्पलाईन क्रमांकावर संताप व्यक्त केला. ‘मदतीसाठी धन्यवाद. हेल्पलाईन नंबर्स कुठल्याही कामाचे नाहीत. जुगाड केला आणि पोलिस मदतीसाठी पोहोचलेत. आता माझी भाची सुरक्षित आहे. तुम्हा सगळ्यांचे आभार. मी पोलिस आणि संबंधित विभागांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे आभार मानतो. पण हेल्पलाईन नंबर्स कुठल्याही कामाचे नाहीत, यावर मी ठाम आहे,’असे त्यांनी लिहिले.
I want to thank the police and the concerned department for responding quickly but I would still say that the helpline numbers were of no use thank you all for the support from the bottom of my heart🙏🙏
— Tigmanshu Dhulia (@dirtigmanshu) January 26, 2020
दरम्यान भारतीय रेल्वेने तिग्मांशू यांच्या या ट्वीट ची दखल घेतली. ज्या हेल्पलाईन नंबर्सवरून मदत मिळाली नाही, ते नंबर्स आम्हाला पाठवलेत तर आभारी असू, असे भारतीय रेल्वेने ट्वीट केले.
साहेब, बीवी और गँगस्टर या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या तिग्मांशू यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चरस, शागिर्द, पान सिंग तोमर, साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स अशा अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.