Video : Tik Tokच्या मधुबालाला पाहून नेटकरी ‘सैराट’, अनेकांना लावलं याडं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 10:22 AM2019-10-10T10:22:32+5:302019-10-10T10:22:38+5:30

कोण आहे ही ‘टिक टॉक’ची मधुबाला?

tik toks madhubala video goes viral twitter asks karan johar to give her a film | Video : Tik Tokच्या मधुबालाला पाहून नेटकरी ‘सैराट’, अनेकांना लावलं याडं

Video : Tik Tokच्या मधुबालाला पाहून नेटकरी ‘सैराट’, अनेकांना लावलं याडं

googlenewsNext
ठळक मुद्देलोक या ‘टिक टॉक’च्या मधुबालाच्या इतक्या प्रेमात आहेत की, अनेकांनी बॉलिवूड निर्माता करण जोहरला टॅग करत प्रियंकाला चित्रपटात घेण्याची गळ घातली आहे.

सध्या ‘टिक टॉक’वर प्रियंका कंडवाल नावाच्या एका तरूणीने धुमाकूळ घातला आहे. याचे कारण आहे, आपल्या मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी तसेच ‘सौंदर्याची राणी’ म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची अभिनेत्री मधुबाला. आता ही तरूणी आणि मधुबाला यांचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर संबंध आहे. प्रियंका कंडवाल नामक ही मुलगी अगदी हुबेहुब मधुबालासारखी दिसते. ‘टिक टॉक’वरच्या प्रत्येक व्हिडीओत प्रियंका मधुबालाच्या लूकमध्ये आहे. आता तर लोकांनी तिला ‘टिक टॉक’ची मधुबाला असे नावही दिले आहे.




प्रियंकाचा चेहरा ब-याच अंशी मधुबालाशी मिळताजुळता आहे. त्यामुळे लोकांनी तिचे ‘टिक टॉक’ची मधुबाला असे नामकरण केले. लोक या ‘टिक टॉक’च्या मधुबालाच्या इतक्या प्रेमात आहेत की, अनेकांनी बॉलिवूड निर्माता करण जोहरला टॅग करत प्रियंकाला चित्रपटात घेण्याची गळ घातली आहे.




खरे तर ‘टिक टॉक’वर बॉलिवूड स्टार्ससारखे दिसणारे अनेक जण आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफसारखी हुबेहूब दिसणारी एक मुलगी चर्चेत आली होती. कतरीनाच्या या ‘लूक अ लाईक’चे नाव एलिना राय आहे, जी मुंबईची राहणारी आहे. त्यापूर्वी ‘टिक टॉक’वर विराट कोहलीचा डुप्लिकेटही सापडला होता. पण या सगळ्यांत ‘टिक टॉक’च्या मधुबालाची बातच काही और आहे. तिचे काही व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हे याची खात्री पटेल.
तेव्हा बघा तर...







 

Web Title: tik toks madhubala video goes viral twitter asks karan johar to give her a film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.