Vijay Sethupathi : विजय सेतुपतीचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल, नव्या फोटोत ओळखणंही झालं कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 11:51 AM2022-12-14T11:51:12+5:302022-12-14T11:52:25+5:30
Vijay Sethupathi : गेल्या अनेक दिवसांपासून विजय सेतुपती पब्लिकली दिसला नव्हता. पण नुकताच त्याने स्वत:चा एक फोटो शेअर केला आणि हा फोटो पाहून चाहतेही थक्क झालेत.
टॉलिवूडचा सुपरस्टार विजय सेतुपतीला ( Vijay Sethupathi) आज कोण ओळखत नाही. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून विजय सेतुपती पब्लिकली दिसला नव्हता. पण नुकताच त्याने स्वत:चा एक फोटो शेअर केला आणि हा फोटो पाहून चाहतेही थक्क झालेत. होय, या फोटोत विजयला ओळखणंही कठीण झालं आहे.
होय, विजय सेतुपतीनं वजन कमी केलं आहे. वेट लॉसनंतरचा नव्या लुकमधील एक फोटो त्याने शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. विजयने हसºया चेहºयाचा एक सेल्फी शेअर केला आहे. विजयने या फोटोला काहीही कॅप्शन दिलेलं नाही. पण या फोटोतील विजयचं ट्रॉन्सफॉर्मेशन स्पष्ट दिसतंय. फोटोत विजय क्लीन शेवमध्ये आहे. पांढºया शर्टमधील त्याचा हा लुक त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांची आठवण करून देणारा आहे. अनेकांना हा फोटो पाहून तरूणपणीच्या विजयची आठवण झाली.
विजय कधीच सेल्फी शेअर करत नाही. पण यावेळी त्याने सेल्फी शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
विजय सेतुपती आज सुपरस्टार आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठीचा त्याचा स्ट्रगल मोठा आहे. तामिळनाडूतील राजपालयम या गावातील अगदीच सामान्य परिवारात विजय सेतुपतीचा जन्म झाला. सेतुपतीला ना अभ्यासात गती होती, ना खेळात रूची. त्याच्या डोक्यात फक्त आणि फक्त अॅक्टिंगचा किडा होता. अॅक्टिंगमध्ये येण्याआधी त्याने अनेक छोट्यामोठ्या नोकऱ्या केल्या.
कॉमर्समध्ये पदवी घेतल्यानंतर कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यासाठी विजय सेतुपतीने दुबईला जायचा निर्णय घेतला. पण या नोकरी त्याचं मन रमलं नाही. अखेर त्याने भारतात परण्याचा निर्णय घेतला. दुबईवरुन परत आल्यानंतर विजयने पुन्हा पैशासाठी अनेक कामं केलीत. इंटिरिअर डिझाईनिंग, माकेर्टींगचं काम त्यानं केलं. पण कुठेही त्याचं मन रमेना. अखेर त्याने चेन्नईचा एक थिएटर ग्रुप जॉईन केला. या ठिकाणी तो अभिनयासोबतच अकाउंटचे कामही करायचा.
सुरूवातीला त्याला सपोर्टिंग अॅॅक्टरचा रोल मिळाले. टीव्हीचे काही शो त्याने केले आणि अखेर 2011 मध्ये त्याला पहिला ब्रेक मिळाला. सीनू रामासामी यांच्या ‘थेनमेरकु पारूवाकात्रू’या चित्रपटात तो लीड हिरो म्हणून झळकला आणि एका रात्रीत स्टार झाला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही.