'या' गंभीर आजाराशी लढा देतायेत टॉम ऑल्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 11:31 AM2017-09-11T11:31:28+5:302017-09-11T17:04:29+5:30

बॉलिवूड अभिनेते पद्मश्री टॉम ऑल्टर यांना एक गंभीर आजाराने ग्रासले आहे. मुंबईतल्या सैफी रुग्णालयात ते कॅन्सर सारख्या बलाढ्य रोगाशी ...

Tom Alter is fighting for 'or' serious illness | 'या' गंभीर आजाराशी लढा देतायेत टॉम ऑल्टर

'या' गंभीर आजाराशी लढा देतायेत टॉम ऑल्टर

googlenewsNext
लिवूड अभिनेते पद्मश्री टॉम ऑल्टर यांना एक गंभीर आजाराने ग्रासले आहे. मुंबईतल्या सैफी रुग्णालयात ते कॅन्सर सारख्या बलाढ्य रोगाशी झुंज देतायेत. यासंदर्भातील माहिती टॉमच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. ही माहिती देताना ते म्हणाले ऑल्टर यांच्यावरील उपचार आम्हाला व्यक्तिगत ठेवायची आहे.  गेल्या आठवड्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   

रिपोर्टनुसार टॉम अल्टर हे कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी बॉडी पेन होतेय म्हणून सिटी रुग्णालयात नेण्यात आले होते. इथे चेकअप केल्यानंतर कुटुंबीयांना टॉम अल्टर यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. ऑल्टर यांना बोन कॅन्सर झाला आहे. या गोष्टीचा खुलासा त्यांचा मुलगा टॉम जैमीने केला आहे. ऑल्टर यांनी वयाची 68 पार केली आहे. 

धमेंद्र यांच्या 1979 साली आलेल्या चरस या चित्रपटातून ऑल्टर यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. दिसायला ते ब्रिटिशांसारखे असल्यामुळे त्यांना त्याच पद्धतीचे चित्रपट मिळायचे. टॉम यांनी आतापर्यंत 300 पेक्षा अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांनी छोट्या पडद्यावर देखील काम केले आहे. 'जुनून' मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. यात त्यांनी केशन कलसी नावाची भूमिका साकारली होती. 90च्या दशकात ही मालिका 5 वर्षांपर्यंत चांगली चालली होती. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शनात ही आपला हात आजमावला होता. 1980 ते 1990 च्या दरम्यानी त्यांनी स्पोर्टस जर्नालिस्ट बनत सगळ्यांची मनं जिंकली होती. 2008 साली त्यांनी कला आणि चित्रपट क्षेत्रात केलेल्या योगदानबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारांने गौरविण्यात आले होते. 

Web Title: Tom Alter is fighting for 'or' serious illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.