प्रसिद्ध फॅशन डिझायनर संशयास्पद मृत्यू; घरात आढळलं कार्बन मोनोऑक्साइड सिलेंडर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 10:02 PM2022-06-11T22:02:03+5:302022-06-11T22:02:18+5:30

३५ वर्षीय फॅशन डिझायनर प्रत्युषा बंजारा हिल्स पोलीस स्टेशन हद्दीतील फिल्म नगरमध्ये एका घरात राहत होती.

Top fashion designer Prathyusha Garimella was found dead at her residence in Banjara Hills | प्रसिद्ध फॅशन डिझायनर संशयास्पद मृत्यू; घरात आढळलं कार्बन मोनोऑक्साइड सिलेंडर

प्रसिद्ध फॅशन डिझायनर संशयास्पद मृत्यू; घरात आढळलं कार्बन मोनोऑक्साइड सिलेंडर

googlenewsNext

हैदराबाद - प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाचा(Prathyusha Garimela) संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. बंजारा हिल्स येथील राहत्या घरी ती मृतावस्थेत आढळली. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी माहिती दिली आहे की, डिझायनरच्या बेडरूममधून कार्बन मोनोऑक्साइड देखील जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयास्पद मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

बाथरूममध्ये मृतदेह सापडला
३५ वर्षीय फॅशन डिझायनर प्रत्युषा बंजारा हिल्स पोलीस स्टेशन हद्दीतील फिल्म नगरमध्ये एका घरात राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी जेव्हा तिने सुरक्षा रक्षकाला प्रतिसाद दिला नाही, तेव्हा त्याच्या रक्षकांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तिथे डिझायनरचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला.

स्वतःच्या नावाने बनवलेला ब्रँड
'प्रत्युषा गरिमेला' नावाचा कपड्यांचा ब्रँड म्हणून प्रत्युषाचे स्वतःचे फॅशन लेबल आहे. त्याचे फ्लॅगशिप स्टोअर हैदराबाद, मुंबई येथे आहे. याशिवाय डिझायनर्सनीही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांचे डिझाइन शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने डिझाईन केलेले बहुतांश पोशाख भारतीय शैलीतील आहेत.

Web Title: Top fashion designer Prathyusha Garimella was found dead at her residence in Banjara Hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.