‘टोटल धमाल’ टीमचा ‘धमाल’ प्रमोशन फंडा! वाचाच!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 11:39 AM2019-02-12T11:39:37+5:302019-02-12T11:41:10+5:30
तूर्तास ‘टोटल धमाल’ या चित्रपटाचे धडाक्यात प्रमोशन सुरु आहे आणि अजय व त्याच्या टीमने ‘टोटल धमाल’ला प्रमोट करण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे
अजय देवगणच्या ‘टोटल धमाल’कडे चाहते डोळे लावून बसले आहेत. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. तूर्तास या चित्रपटाचे धडाक्यात प्रमोशन सुरु आहे आणि अजय व त्याच्या टीमने ‘टोटल धमाल’ला प्रमोट करण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. होय, आता एकापाठोपाठ एक अशा पंजाबी, मराठी, गुजराती व भोजपुरी अशा अनेक भाषेत या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला जाणार आहे. हिंदी भाषिक चाहत्यांनाचं नाही तर अन्य बोली भाषा बोलणा-या चाहत्यांनाही या आगामी चित्रपटाची माहिती मिळावी, असा यामागचा उद्देश आहे. यामुळे चित्रपटाला बम्पर ओपनिंग मिळेल, असा अंदाज आहे.
Gheun yet ahot laughter chi dhamakedaar trip! Paha #TotalDhamaal Marathi spoofhttps://t.co/vqu42OH8lE
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) February 11, 2019
ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली. तूर्तास ‘टोटल धमाल’चा मराठी भाषेतील ट्रेलर रिलीज झाला आहे. माधुरी दीक्षितने तिच्या सोशल अकाऊंटवर हा ट्रेलर रिलीज केला आहे. एकंदर काय तर अजय व त्याच्या टीमने अॅक्टिंगसोबतचं मार्केटींगच्या क्षेत्रातही मास्टर स्ट्रोक ठोकला आहे. आता हा मास्टर स्ट्रोक ‘टोटल धमाल’ला किती ओपनिंग मिळवून देतो, ते बघूच.
‘टोटल धमाल’ हा सिनेमा ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. या फ्रेंचाइजीचा दुसरा सिनेमा ‘डबल धमाल’ होता.‘टोटल धमाल’मध्ये माधुरी आणि अनिल कपूर दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनिल कपूर यात अविनाश नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारतो आहे. चित्रपटात माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, जॉनी लिव्हर हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट २२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.