‘बाहुबली २’ च्या ट्रेलरमध्ये दडलंय ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले’ या प्रश्नाचं उत्तर; वाचा सविस्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2017 10:30 AM2017-03-16T10:30:17+5:302017-03-16T16:10:33+5:30

पूर्ण देशाला भेडसावणाºया ‘अखेर कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ या प्रश्नाचेही उत्तर ‘बाहुबली २’ च्या ट्रेलरमध्ये दडल्याचे दिसून येत आहे.

In the trailer of 'Bahubali 2', the answer to the question 'Katapana Bahubali was killed'; Read detailed !! | ‘बाहुबली २’ च्या ट्रेलरमध्ये दडलंय ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले’ या प्रश्नाचं उत्तर; वाचा सविस्तर!!

‘बाहुबली २’ च्या ट्रेलरमध्ये दडलंय ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले’ या प्रश्नाचं उत्तर; वाचा सविस्तर!!

googlenewsNext
ल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा लागलेल्या ‘बाहुबली २’ या ब्लॉकबस्टर सीरिजच्या सिनेमाचे ट्रेलर रिलिज झाले असून, त्यातील थरार रोमांच निर्माण करणारा आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशाला भेडसावणाºया ‘अखेर कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ या प्रश्नाचेही उत्तर ट्रेलरमध्ये दडल्याचे दिसून येत आहे. कारण ट्रेलरमधील पाच अशा गोष्टी स्पष्टपणे दिसत आहेत, ज्यावरून या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास मदत मिळू शकते. आम्ही तुम्हाला या पाच गोष्टी सांगणार आहोत...!



खरं तर प्रत्येकाने विचार केल्यानुसारच बाहुबली-२चा ट्रेलर दाखविला गेला. यात त्या सर्व गोष्टी स्पष्टपणे दिसत आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाण्यास भाग पाडले जाईल. ग्राफिक्स, एडिटिंग, बॅकग्राउंड स्कोर अतिशय सुरेख आहे. त्याचबरोबर डायलॉग, अ‍ॅक्शन सीन्स रोमांच निर्माण करणारे आहेत. अमरेन्द्र बाहुबली आणि महेंद्र बाहुबलीच्या भूमिकेत असलेला प्रभास गेल्या बाहुबलीपेक्षाही दुसºया भागात दमदार भूमिकेत दिसत आहे. भल्लादेवाच्या भूमिकेत असलेला राणा दुगुबती पहिल्या भागापेक्षा याभागात अधिक क्रूर आणि मजबूत दिसत आहे. तर सिनेमात देवासेनाच्या भूमिकेत असलेली अनुुष्का शेट्टी हिचे तरुण रूप बघावयास मिळणार आहे. 



याहीपेक्षा प्रेक्षकांना बाहुबली आणि कटप्पा या दोन पात्रांविषयी अधिक आकर्षण आहे. कारण पहिल्या भागानंतर प्रत्येकाच्याच मनात घर करून असलेल्या ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळणे सहज शक्य आहे. त्यासाठी ट्रेलरचे निरीक्षण करावे लागेल. ‘सीएनएक्स’ टीमने केलेल्या निरीक्षणानुसार आम्ही या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला मदत करीत आहोत. त्यासाठी ट्रेलरमधील या पाच फॅक्टरवर टाकलेला हा कटाक्ष...



१) रक्ताने लतपत असलेली तलवार : जेव्हा अमरेन्द्र बाहुबली राजा म्हणून शपथ घेतो तेव्हा महिसमती राज्यातील लोकांना म्हणतेय की, राज्याच्या संरक्षणासाठी आपला राजा कधीच मागे सरणार नाही. त्यामुळे असे होऊ शकते की, कटप्पाला अमरेन्द्र याला मारण्याचे आदेश दिले गेले असावे. 



२) आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी युद्ध : जेव्हा अमरेन्द्र बाहुबली एक राजा म्हणून शपथ घेतो तेव्हा दोघा भावांमध्ये युद्ध होते. अशात कटप्पा त्याच्या राज्याप्रती खूपच प्रामाणिक असतो, त्यामुळे त्याला दोघांपैकी एकाची निवड करावी लागते. अशात राज्याच्या हितासाठी कदाचित तो राजा बाहुबलीची हत्त्या करीत असावा. 



३) अमरेन्द्र बाहुबलीची ताकद : ट्रेलरमधील तो सीन आठवा ज्यामध्ये बाहुबली म्हणतो की, ‘जब तक तुम मेरे साथ हो तब तक मुझे मारनेवाला पैदा नही हुआ है मामा!’ यावरून हे स्पष्ट होते की, बाहुबलीला कटप्पावर खूप विश्वास असतो, अन् याचा अहंकार असतो; मात्र याचमुळे तो एक घमंडी राजा म्हणून पुढे आला असावा. अन् याच कारणाने राज्याच्या संरक्षणासाठी कटप्पाने बाहुबलीला मारले असावे?



४) जेव्हा कटप्पा बाहुबलीसमोर झुकतो : ट्रेलरमध्ये कटप्पा बाहुबलीसमोर झुकलेला असल्याचे दिसत आहे. हा सीन त्या घटनेअगोदरचा असावा जेव्हा कटप्पा बाहुबलीला मारतो. या सीनमध्ये एका राजाचा अहंकार स्पष्टपणे दिसत आहे. कदाचित या अहंकारामुळेच बाहुबलीचे राज्य धोक्यात आले असावे. तर राज्याच्या संरक्षणासाठी कटप्पाने बाहुबलीला मारण्याचा निर्र्णय घेतला असावा. कारण कटप्पा त्याच्या राज्याप्रती खूपच प्रामाणिक दाखविला आहे. 



५) कवच परिधान केलेला कटप्पा : ट्रेलरमध्ये कटप्पा युद्धात सुरक्षा कवच परिधान करून कोणासोबत तरी युद्ध करीत आहे. यावरून एक गोष्ट पुन्हा सिद्ध होते की, कटप्पा त्याच्या राज्याप्रती किती प्रामाणिक असतो. कदाचित याच कारणामुळे तो त्याच्या अहंकारी राज्याची हत्त्या करतो. 

Web Title: In the trailer of 'Bahubali 2', the answer to the question 'Katapana Bahubali was killed'; Read detailed !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.