Trailer : 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', पाहा सोनम-अनिल कपूरची भन्नाट केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:53 PM2018-12-27T12:53:02+5:302018-12-27T13:01:39+5:30

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे गाणं जेव्हा कधी समोर येते त्यावेळी अनिल कपूरची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आता याच गाण्यावर आधारित सिनेमा येतोय आणि या सिनेमाचे ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

Trailer 'Ek Ladki Ko Dekha Toh Aisa Laga', see Sonam-Anil Kapoor's chemistry | Trailer : 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', पाहा सोनम-अनिल कपूरची भन्नाट केमिस्ट्री

Trailer : 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', पाहा सोनम-अनिल कपूरची भन्नाट केमिस्ट्री

googlenewsNext
ठळक मुद्दे पहिल्यांदाच सोनम कपूर अनिल कपूरसोबत सिल्वर स्क्रिन शेअर करते आहेविधू विनोद चोप्रा यांची बहिण शैली चोप्रा या सिनेमाचे दिग्दर्शन करते आहे

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे गाणं जेव्हा कधी समोर येते त्यावेळी अनिल कपूरची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आता याच गाण्यावर आधारित सिनेमा येतोय आणि या सिनेमाचे ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यात अनिल कपूर, सोनम कपूर, राजकुमार राव आणि जुही चावला यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा एक रोमाँटिक सिनेमा आहे.   

 

 

 


या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदा सोनम कपूर अनिल कपूरसोबत सिल्वर स्क्रिन शेअर करते आहे. 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'.  १९९४ साली विधू विनोद चोप्रा यांचा १९४२ अ लवस्टोरी हा सिनेमा प्रदर्शित केला होता. या सिनेमात 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे गाणं होते या गाण्यावरुन सिनेमाचे नाव घेण्यात आले आहे. राजकुमार आणि सोनम कपूर पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. सोनमच्या आयुष्यातील एक गूपित ज्याबद्दल ती वारंवार ट्रेलरमध्ये बोलते, हे नक्की काय असेल याबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा ट्रेलर आहे. 



 

विधू विनोद चोप्रा यांची बहिण शैली चोप्रा या सिनेमाचे दिग्दर्शन करते आहे. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा हा सिनेमा येत्या १ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. कुटुंबासोबत काम करणे नेहमीच खूप मजेशीर असल्याचे सोनम म्हणाली.

Web Title: Trailer 'Ek Ladki Ko Dekha Toh Aisa Laga', see Sonam-Anil Kapoor's chemistry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.