Trailer Launch : जेव्हा सचिन तेंडुलकरने चक्क बस कंडक्टरला मागितले चित्रपटाचे तिकीट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2017 04:58 PM2017-04-13T16:58:03+5:302017-04-13T22:28:03+5:30

​क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज त्याच्या जीवनावर आधारित डॉक्यू-ड्रामा फिल्म ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’चे ट्रेलर लॉन्च केले. मुंबई येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात दिग्दर्शक तथा निर्माता उपस्थित होते.

Trailer Launch: When Sachin Tendulkar asked for a good bus conductor, the movie ticket! | Trailer Launch : जेव्हा सचिन तेंडुलकरने चक्क बस कंडक्टरला मागितले चित्रपटाचे तिकीट!

Trailer Launch : जेव्हा सचिन तेंडुलकरने चक्क बस कंडक्टरला मागितले चित्रपटाचे तिकीट!

googlenewsNext
रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज त्याच्या जीवनावर आधारित डॉक्यू-ड्रामा फिल्म ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’चे ट्रेलर लॉन्च केले. मुंबई येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात दिग्दर्शक तथा निर्माता उपस्थित होते. तर आॅडियन्समध्ये सचिनची पत्नी अंजली उपस्थित होती. 



कार्यक्रमात सचिनच्या चेहºयावरील आनंद स्पष्टपणे झळकत होता. यावेळी त्याने एक असा काही किस्सा सांगितला की, उपस्थित असलेले सगळेच लोक अवाक् झाले. सचिनने म्हटले की, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने मला म्हटले की, तू पहिल्यांदा कोणता चित्रपट बघितला होता. त्या व्यक्तीच्या प्रश्नामुळे मला एक किस्सा आठवला. मी घरी होतो त्यावेळेस माझे वय जेमतेम ३-४ वर्ष इतकेच होते. त्यावेळेस माझ्या परिवारातील सर्व मंडळी धर्मेंद्रच्या ‘मॉँ’ या चित्रपटाबाबत चर्चा करत होते. त्यामुळे मला या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता वाढली होती. अखेर तो दिवस आला अन् आम्ही सगळे चित्रपट बघण्यासाठी गेलो. त्यावेळेस आम्ही सगळे बसने प्रवास करीत होतो. जेव्हा कंडक्टरने मला तिकिटाविषयी विचारले, तेव्हा मी त्याला मला ‘मॉँ’ चित्रपटाचे तिकीट हवे असे म्हटले. माझ्या या विचित्र मागणीने कंडक्टरदेखील काही काळ अवाक् झाला. 



पुढे बोलताना सचिन म्हणाला की, असे किस्से कधी-कधी आठवतात तर चेहºयावर हसू उमलटते. शिवाय अशाच प्रकारच्या काही मोमेंट्स आम्ही या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे की, या मोमेंट्स प्रेक्षकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहतील. यावेळी सचिन भावुक झाल्याचेही स्पष्टपणे दिसून आले. तो म्हणाला की, १९९० मध्ये जेव्हा मी पहिले शतक झळकावून प्रेस कॉनफरन्सला गेलो होतो तेव्हा जसा नर्वेसनेस आला होता; अगदी तसाच नर्वेसनेस मला आता जाणवत आहे. 



यावेळी सचिनने असेही म्हटले की, त्याला खात्री होती की एक दिवस त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविला जाईल. खरं तर मी एक प्रायवे पर्सन आहे. मात्र लोक आणि माझे फॅन्स माझ्याविषयी खूप काही जाणून घेऊ इच्छितात. या चित्रपटातून माझ्या व्यक्तिगत जीवनातील अनेक घटनांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्यामुळे माझ्या फॅन्सना माझ्याविषयी ज्या गोष्टी माहीत नाहीत, त्याही गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून समजतील, असेही त्याने सांगितले. 



यावेळी सचिनने म्हटले की, जर मला माझ्या क्रिकेट जीवनातील एखाद्या अविस्मरणीय क्षणाबद्दल विचारले तर तो क्षण १९८३ चा वर्ल्डकप असेल. जेव्हा मी कपिल देव यांच्या हातात वर्ल्ड कप ट्रॉफी बघितली तेव्हाच मी ठरविले होते की, एक दिवस मीही वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकणार. २०११ च्या वर्ल्ड कप जिंकण्याविषयी सचिनने म्हटले की, तो क्षण आजही माझ्या स्मरणात आहे. यावेळी सचिनच्या या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनेकांनी कौतुक केले. 

Web Title: Trailer Launch: When Sachin Tendulkar asked for a good bus conductor, the movie ticket!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.