'ठग्स ऑफ हिंदुस्तान'साठी आमिर घेतोय माल्टामध्ये ट्रेनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2017 05:54 AM2017-05-31T05:54:34+5:302017-05-31T11:24:34+5:30

आमिर खान त्याचा आगामी चित्रपट ठग्स ऑफ हिंदुस्तानसाठी युरोपमधील माल्टा शहरात जाऊन ट्रेनिंग घेतो आहे. याचित्रपटात अनेक मोठे एक्शन ...

Training in Malta taking Amir for 'Thugs of Hindustan' | 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'साठी आमिर घेतोय माल्टामध्ये ट्रेनिंग

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'साठी आमिर घेतोय माल्टामध्ये ट्रेनिंग

googlenewsNext
िर खान त्याचा आगामी चित्रपट ठग्स ऑफ हिंदुस्तानसाठी युरोपमधील माल्टा शहरात जाऊन ट्रेनिंग घेतो आहे. याचित्रपटात अनेक मोठे एक्शन सीन्स आहेत. यासाठी आमिर खान माल्टामध्ये जाऊन ट्रेनिंग घेतोय. या चित्रपटाला घेऊन आमिर खूपच उत्साहित आहेत. या चित्रपटाची सुरुवातच मोठ्या एक्शन सीन्सपासूनच होणार आहे. चित्रपटात समुद्रातील एक्शन सीन्सदेखील आहेत. यशराज बॅनर खाली तयार होणाऱ्या या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि आमिर खान पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. चित्रपटात बिग बी आमिर खानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबाबत आमिर म्हणतो, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे म्हणजे माझे स्वप्न पूर्ण होणाऱ्यासारखे आहे. मी त्यांचा पहिल्यापासूनच खूप मोठा फॅन आहे. त्यांच्यासोबत काम करायला मिळणार म्हणून मी खूप एक्साईडेट आहे. अमितजींसोबत पडद्यावर काम करणे माझ्यासाठी अविस्मरणीय असणार आहे.    


ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्या ही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याचित्रपटाची शूटिंग 5 जूनपासून सुरु होणार आहे. ही शूटिंग जहाजावर सुरु होणार असल्याचे समजते आहे. या चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या जहाजांची बांधणी 18व्या शतकाच्या सुरुवातीला झाली असल्याचे  दिग्दर्शकाने सांगितले आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन विजय कृष्णा आर्चाय करत आहेत. तर आदित्य चोप्रा चित्रपटाचे प्रॉडक्शनचे काम बघणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. ठग्स ऑफ हिंदुस्तान  2018च्या दिवाळीपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर आणि अमिताभ यांचे फॅन्स हा चित्रपट रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहात असतील. 

Web Title: Training in Malta taking Amir for 'Thugs of Hindustan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.