Trapped : राजकुमार रावने २० दिवस खाल्ले फक्त गाजर!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2017 12:20 PM2017-02-23T12:20:52+5:302017-02-23T17:50:52+5:30
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याच्या आगामी ‘ट्रॅप्ड’ या सिनेमाचा ट्रेलर गेल्या बुधवारी रिलीज झाला असून, सोशल मीडियावर सध्या या ट्रेलरने धूम उडवून दिली आहे.
ब लिवूड अभिनेता राजकुमार राव याच्या आगामी ‘ट्रॅप्ड’ या सिनेमाचा ट्रेलर गेल्या बुधवारी रिलीज झाला असून, सोशल मीडियावर सध्या या ट्रेलरने धूम उडवून दिली आहे. ट्रेलरमधील राजकुमार राव याचा लूक प्रेक्षकांना त्यातही यंगस्टरला चांगला भावत असल्याने रिलीजअगोदरच सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र या लूकसाठी राजकुमारला काय कष्ट करावे लागले, हे जर तुम्ही ऐकले तर तुमचा विश्वास बसणार आहे. कारण सिनेमातील भूमिकेसाठी योग्य तो शारीरिक बदल करण्यासाठी त्याने तब्बल २० दिवस निव्वळ गाजर व ब्लॅक कॉफी पिली आहे.
‘उडान आणि लुटेरा’ यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केलेले विक्रमादित्य मोटवानी यांचा ‘ट्रॅप्ड’ हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट समजला जातो. सिनेमात राजकुमार अशा व्यक्तीची भूमिका साकारत आहे, जो एका गगनचुंबी इमारतीत असलेल्या स्वत:च्याच घरात कैद होतो. या भूमिकेसाठी त्याला प्रचंड शारीरिक बदल करावा लागला. अर्थातच यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. याविषयी राजकुमारने एका न्यूज एजन्सीशी बोलताना सांगितले की, ही भूमिका माझ्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दमविणारी होती. कारण मला गगनचुंबी घरात तब्बल १८ ते २० दिवस राहावे लागले. हा माझ्यासाठी खूपच थकविणारा अनुभव होता. जर तुम्ही दोन दिवस काहीही खाल्ले नाही तर, तुमच्या स्वभावात लगेचच बदल होतो. तुम्ही चिडचिड करायला लागता.
राजकुमारने ‘ट्रॅप्ड’च्या ट्रेलरविषयी सांगितले की, जर माझा सिनेमा बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरला तर मला आनंद होईलच पण, आश्चर्यही वाटणार नाही. कारण स्टारडम ही एक अशी गोष्ट आहे जी अचानकच तुम्हाला मिळते. राजकुमार या अगोदर ‘अलीगढ’ आणि ‘क्वीन’ या सिनेमात झळकलेला आहे. त्याला बेस्ट अॅक्टर या कॅटेगिरीत राष्टÑीय पुरस्कार मिळालेला आहे. त्याचा ‘ट्रॅप्ड’ हा सिनेमा येत्या १७ मार्च रोजी रिलीज होणार आहे.