Trending: ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं, पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायचा बोलबाला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 04:50 PM2019-10-01T16:50:36+5:302019-10-01T16:54:17+5:30
यावेळी ऐशने परिधान केलेल्या खास आणि ड्रेसमुळे प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.
सध्या सर्वात जास्त चर्चा रंगते ती लॉरियाल पॅरिस ले डिफायल शो. कोण काय परिधान करणार? नेहमीप्रमाणे यावेळीही कोणता नवा ट्रेंड पाहायला मिळणार? कोणाची फॅशन सर्वाधिक हटके ठरणार याकडे साऱ्यांच्या नजरा असतात. तशीच उत्सुकता यंदाच्या कान्स सोहळ्यासाठी आहे. यंदाच्या या फेस्टिव्हलच्या सुरुवातीलाच ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं असं काहीसं घडलं. अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल.
बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा. आरस्पानी सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी ऐश प्रसिद्ध आहे. ऐशच्या फॅशन आणि स्टाईलचा जलवा फक्त बॉलीवुड पार्ट्या, इव्हेंट्स आणि केवळ भारतात पाहायला मिळतो असं नाही. सातासमुद्रापार कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही ऐशने आपल्या हटके फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट्ने हॉलीवुडच्या मंडळींची आणि जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा ऐश्वर्या आपल्या फॅशन आणि हटके स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.यावेळी ऐशने परिधान केलेल्या खास आणि ड्रेसमुळे प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.
तिने इटालियन डिझायनर गिएमबटिस्टा वल्लीने डिझाईन केलेला आउटफिट परिधान केला होता. पर्पल ड्रेसमध्ये ऐश्वर्या अतिसुंदर दिसत होती. सोबतच यामध्ये एक लांब ट्रेल होती. या ट्रेलमुळे या ड्रेसला क्लासिक लुक आला होता. तिचे व्हाइट रफल्ड शुज तिच्या लुकला पूर्ण करत होते. ऐश्वर्याचे या रॅम्प वॉकद्वारे पॅरिस फॅशन वीकमध्ये पदार्पण होते संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या आकर्षणाची केंद्र ठरली होती. विशेष म्हणजे गेल्या 18 वर्षांपासून ऐश्वर्या लॉरियालची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. यावेळी तिचा हा अंदाज कोणालाही घायाळ करेल असाच होता. नेहमीप्रमाणे तिच्या या स्टाईल आणि फॅशनने साऱ्यांनाच प्रभावित केले.