तृप्ती डिमरी झाली मुंबईकर! रणबीर कपूरच्या घराजवळच घेतला आलिशान बंगला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 01:15 PM2024-06-08T13:15:50+5:302024-06-08T13:17:04+5:30

तृप्ती डिमरीचं सध्या नशीबच फळफळलं आहे. अनेक चित्रपटांमध्ये सध्या ती व्यस्त झाली आहे. त्यात आता मुंबईत घराचं स्वप्नही पूर्ण झालं आहे.

Tripti Dimri buys home in bandra are Mumbai beside Ranbir Kapoor s house | तृप्ती डिमरी झाली मुंबईकर! रणबीर कपूरच्या घराजवळच घेतला आलिशान बंगला

तृप्ती डिमरी झाली मुंबईकर! रणबीर कपूरच्या घराजवळच घेतला आलिशान बंगला

अॅनिमल (Animal) सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आता मुंबईकर झाली आहे. सिनेमा हिट होताच तृप्तीचं नशीबच फळफळलं आहे. तिच्याकडे सध्या सिनेमांची रांग लागली आहे. तर आता तिने नुकतंच मुंबईत घरही खरेदी केलं आहे. अपार्टमेंटमध्ये दोन मजले विकत घेत ती शिफ्ट झाली आहे. या फ्लॅटची किंमच कोटींच्या घरात आहे. विशेष म्हणजे रणबीर कपूर, सलमान खान हे सेलिब्रिटी राहतात त्याच्याच जवळ तिने फ्लॅट घेतला आहे.

'पहाडी गर्ल' अभिनेत्री तृप्ती डिमरी खऱ्या अर्थाने आता मुंबईकर झाली आहे. मुंबईतील कार्टर रोड येथे तिने आलिशान घर खरेदी केलं आहे. IndexTap च्या रिपोर्टनुसार, बांद्रा पश्चिम येथील कार्टर रोडवर हा आलिशान बंगला आहे. ग्राऊंड प्लस दोन मजले असा हा बंगला असून याची किंमत तब्बल 14 कोटी इतकी आहे. 2226 चौरस फीट बंगल्याचा एरिया आहे. 3 जून रोजीच तिने घराचं रजिस्ट्रेशन पूर्ण केलं. यासाठी तिने 70 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली.

तृप्तीने ज्याठिकाणी घर खरेदी केलं आहे त्याच्या आसपास अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात.  रेखा, रणबीर कपूर, आलिया भट्ट, सलमान खान यांची घरंही तिथेच जवळ असल्याचं समोर आलं आहे. तृप्ती सध्या 'भूलभूलैय्या 2' चं शूट करत आहे. शिवाय कार्तिक आर्यनसोबत ती आणखी एका सिनेमात दिसणार आहे. तसंच विकी कौशलसोबतचा तिचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. राजकुमार रावसोबतचा सिनेमाही रांगेत आहे.

तृप्ती डिमरीने 2017 सालीच करिअरला सुरुवात केली होती. तिने 'मॉम','लैला मजनू','बुलबुल','कला' अशा अनेक सिनेमात काम केलं. हे चित्रपट हिटही झाले. पण तिला खरी लोकप्रियता 'अॅनिमल' मुळे मिळाली.

Web Title: Tripti Dimri buys home in bandra are Mumbai beside Ranbir Kapoor s house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.