"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 09:22 AM2024-10-02T09:22:17+5:302024-10-02T09:23:06+5:30
तृप्ती डिमरीच्या सिनेमावरही त्या महिलांचा बहिष्कार
Animal सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आगामी 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमामुळे चर्चेत आहे.राजकुमार रावसोबत ती सध्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान काल तृप्तीला जयपूरमध्ये एका इव्हेंटसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. तृप्तीने इव्हेंटला होकार दिला होता मात्र ऐनवेळेस ती आलीच नाही. यामुळे इव्हेंटमधील महिला संतापल्या आणि त्यांनी तृप्तीच्या पोस्टरला काळं फासल्याची घटना घडली आहे.
सोशल मीडियावरजयपूरचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये एक महिला रागात तृप्ती डिमरीच्या पोस्टरवर काळ्या शाईने रेघोटे ओढत आहे. ती म्हणते, "हिचा सिनेमा कोणीही पाहणार नाही. कमिटमेंट देऊनही हे लोक येत नाहीत. टाईम मॅनेजमेंट कळालं पाहिजे. अशी किती मोठी सेलिब्रिटी आहे ही? कोणाला हिचं नावही माहित नसेल. आम्ही तर कोण आहे हेच बघायला आलो होतो. अजून कोणाला माहितही नाही आणि हे तिचं आयुष्य आहे. ती सेलिब्रिटी म्हणण्याच्या लायकीचीही नाही."
आणखी एका व्हिडिओत इव्हेंटच्या व्यवस्थापक तृप्तीच्या व्हिडिओ काळं फासत आहेत. 'हिचं तोंड काळं करा' असं महिला ओरडत आहेत.
This is so bad, ya! Just because #TriptiiDimri is a celeb that doesnt give anyone the right to do such things for a meagre 5 L.
— Bollywood Talkies (@bolly_talkies) October 1, 2024
Not only her, many actors will be scared to attend ficci flo’s events #VickyVidyaKaWohWalaVideo
pic.twitter.com/vPOnA7MwOt
एक महिला म्हणाली,"जयपूरने तृप्तीचा बहिष्कार केला पाहिजे. आम्ही तिच्याविरोधात केस दाखल करु. मी तिला अर्धे पैसे ट्रान्सफर केले आणि बाकी करणार होते पण मी थांबले. कारण ते मला ५ मिनिटे वाट पाहण्यासाठी सांगत होते. तिच्याकडे अजूनही अर्धे पैसे आहेत. एकूण डील ५.५ लाखांची झाली होती. तिने आमचा अपमान केला आहे. जयपूरमध्ये तिच्या सिनेमांवर बहिष्कार घातला पाहिजे. पैसे घेतल्यानंतर वेळ बदलत आहे. आता ती पळ काढत आहे. आता आपण तिच्या सिनेमांपासून दूर पळू."
'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमा ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. याशिवाय तिचा 'भूलभूलैय्या 3','धडक २' हेही सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.