सावत्र आई मान्यता दत्तचा रेड बिकिनीतील फोटो बघून त्रिशालाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2017 02:21 PM2017-06-29T14:21:36+5:302017-06-29T19:51:36+5:30

सध्या दत्त परिवार ‘मोनाको’ येथे व्हेकेशन एन्जॉय करीत असून, फुल टू धमालच्या मुडमध्ये आहे. संजय दत्तची पत्नी तर हे ...

Trishala gave a 'This' reaction by looking at the steps taken by Savitri Mother Datta's red bikini photos! | सावत्र आई मान्यता दत्तचा रेड बिकिनीतील फोटो बघून त्रिशालाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

सावत्र आई मान्यता दत्तचा रेड बिकिनीतील फोटो बघून त्रिशालाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

googlenewsNext
्या दत्त परिवार ‘मोनाको’ येथे व्हेकेशन एन्जॉय करीत असून, फुल टू धमालच्या मुडमध्ये आहे. संजय दत्तची पत्नी तर हे व्हेकेशन चांगलेच एन्जॉय करीत असून, त्यातील काही फोटोज्ही सोशल मीडियावर शेअर करीत आहे. सुरुवातीला तिने ब्लू कलरचा बिकिनी फोटो पोस्ट करून धूम उडवून दिली होती. त्यानंतर तिने रेड कलरच्या बिकिनीतील फोटो पोस्ट करून चार चॉँद लावले. कारण तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड पसंत केले जात असून, ती जुळ्या मुलांची आई आहे, यावर विश्वास ठेवणे मुश्किल होत आहे. मान्यताच्या या फोटोला तिचे चाहते ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत, त्याच पद्धतीने संजूबाबाच्या पहिल्या पत्नीची मुलगी त्रिशाला हिनेही फोटोला प्रतिक्रिया दिली आहे. मात्र प्रतिक्रिया वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा त्रिशालाने मान्यताचे इन्स्टावरील बिकिनी फोटो बघितले तेव्हा तिने ‘लुकिंग आॅसम’ अशी कमेण्ट पोस्ट केली. तिची ही कमेण्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 



शिक्षा भोगून बाहेर आलेला संजय दत्त चित्रपटांबरोबरच आपल्या परिवारालाही अधिकाधिक वेळ देत आहे. त्याने नुकतेच ‘भूमी’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. सध्या तो ‘मोनाको’ येथे आपल्या परिवारासोबत व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. मान्यता तर बिनधास्तपणे व्हेकेशनचे फोटोज् सोशल मीडियावर अपलोड करीत असल्याने सध्या ती चर्चेत आहे. मात्र दत्त परिवाराच्या या व्हेकेशनमध्ये संजूबाबाची मुलगी त्रिशाला ही सहभागी झाली नाही. परंतु सोशल मीडियावर ती ही संपूर्ण ट्रिप फॉलो करीत आहे. जेव्हा मान्यताने तिचे बिकिनी फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले होते, तेव्हा त्याला कमेण्ट देण्याची इच्छा त्रिशालालाही झाली. तिने आपल्या सावत्र आईच्या बिकिनी फोटोला ‘लुकिंग आॅसम’ अशी प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया बघून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे स्टेप मॉम आणि स्टेप डॉटरमधील नाते खूपच दृढ आहे. 



काही दिवसांपूर्वीच मान्यता त्रिशालाला भेटण्यासाठी न्यू यॉर्कला गेली होती. त्यावेळी दोघींनीही एकमेकींसोबत चांगला टाइम स्पेंड केला होता. मात्र काही वर्षांचा जर विचार केला तर त्यांच्यातील नाते फारसे चांगले नव्हते. आता मात्र त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा दुरावा राहिला नसून, दोघीही चांगल्या मैत्रिण झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मान्यताने एका मुलाखतीत म्हटले होते की, त्रिशालाने परत भारतात यावे. कारण तिच्या मते, जेव्हा त्रिशाला परत येईल तेव्हाच त्यांचा परिवार पूर्ण होईल. आता दोघींमधील नाते पाहता, मान्यताची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. 

Web Title: Trishala gave a 'This' reaction by looking at the steps taken by Savitri Mother Datta's red bikini photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.