Trolls : ऋषी कपूरचे पुन्हा ट्विट, शिवी द्याल तर शिवीच मिळेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2017 12:23 PM2017-03-08T12:23:55+5:302017-03-08T17:54:59+5:30
ट्विटरवर ट्रोल करणाºया कित्येकांना डायरेक्ट मॅसेजेस् पाठवून अभद्र भाषा वापरण्याचा आरोप असलेले अभिनेता ऋषी कपूर यांनी आता ट्रोलवाल्यांना निपटण्यासाठी ...
ट विटरवर ट्रोल करणाºया कित्येकांना डायरेक्ट मॅसेजेस् पाठवून अभद्र भाषा वापरण्याचा आरोप असलेले अभिनेता ऋषी कपूर यांनी आता ट्रोलवाल्यांना निपटण्यासाठी एक नवा फॉर्म्युला शोधून काढला आहे. त्यांनी ट्विटरचा त्यांचा प्रोफाइल फोटो बदलताना एक ट्विट केले, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, यापुढे मला कोणीही ट्रोल करू नका. जर असा कोणी प्रयत्न केलाच तर त्याला ब्लॉक केले जाईल. त्याचबरोबर शिवी देणाºयास शिवीच मिळेल!
मात्र ऋषीच्या या प्रत्युत्तराची खरी गंमत म्हणजे त्यांचा प्रोफाइल फोटो आहे. बंदूक हातात असलेला हा फोटो ट्रोल करणाºयांप्रती त्यांच्या मनात असलेल्या रागाविषयी बरेच काही सांगून जातो. कारण या फोटोला बघून असे वाटत आहे की, ऋषी कपूर ट्रोल करणाºया युजर्सना जणूकाही गोळ्या झाडण्याची वॉर्निंगच देत आहेत. ऋषी कपूर ट्विटरवर नेहमीच सक्रिय असतात. मात्र त्याचबरोबर ट्रोल करणाºयास जशास तसे उत्तर देण्यासही त्यांचा हातखंडा आहे. काही दिवसांपूर्वी ट्रोल करणाºयास त्यांनी असे काही फटकारले होते की, थेट त्याला शिवीगाळ करणारे ट्विट त्यांच्याकडून केले गेले होते.
या प्रकरणाचा खुलासा करताना गेल्या बुधवारी ऋषीने ट्विट करताना लिहिले की, ‘भविष्यात ट्रोल्स करणाºया आणि शिव्या देणाºयांना मी वॉर्निंग देतो. जे समजूतदार आहेत त्यांनी याकडे दुर्लक्ष करावे. चला फन वर्ल्डमध्ये जगूया!’ यावेळी ऋषी यांनी त्यांचा बायोदेखील चेंज केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘ट्रोल्स आणि शिव्या देण्याचा कोणी प्रयत्नही करू नये. असे केल्यास तुम्हाला शिव्याच मिळतील, शिवाय ब्लॉकदेखील केले जाईल. मला लाईक्स करू नका, अनफॉलो करा’ असेही त्यांनी लिहिले.
काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर यांनी करण जोहर बाप बनल्याच्या घोषणेनंतर काही ट्विट्स केले होते. तेव्हापासून ट्रोल प्रकरण वाढत गेले. काही युजर्सनी ऋषी कपूरने मॅसेज् बॉक्समध्ये दिलेल्या शिव्यांचे स्क्रीनशॉट शेअर करून त्यांचा खरा चेहरा समोर आणल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर बॉलिवूडचा हाच तो वरिष्ठ अभिनेता, असेही म्हटले होते.

☠️Released new Warning Bio for future Trolls,Abusers and Idiots! Refer profile. Please ignore sensible friends. Let's live in a fun World