तृप्ती डिमरीचा डान्स नंबर, आगामी सिनेमात राजकुमार रावसोबत झळकणार; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 04:29 PM2024-09-09T16:29:11+5:302024-09-09T16:30:53+5:30
राजकुमार रावसोबत तिचा 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' रिलीज होणार आहे.
अभिनेत्री तृप्ती डिमरीने (Tripti Dimri) Animal सिनेमातून प्रेक्षकांवर भुरळच पाडली. या सिनेमानंतर तिला 'भाभी 2' हीच ओळख मिळाली. पाहता पाहता तृप्ती डिमरीकडे सिनेमांची रांगच लागली. विकी कौशलसोबत तिचा 'बॅड न्यूज' रिलीज झाला. तर आता राजकुमार रावसोबत तिचा 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' रिलीज होणार आहे. नुकतंच या सिनेमातील तिचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तृप्ती डिमरीचा डान्स नंबर आजपर्यंत आलाच नव्हता. आगामी 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' मध्ये तिची राजकुमार रावसोबत जोडी जमली आहे. यातही तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. सिनेमाच्या सेटवरुन तिचा व्हिडिओ व्हायरल होतोय. नेव्ही ब्लू रंगाच्या टू पीसमध्ये ती हॉट आणि बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. ती गाण्यावर जबरदस्त ठुमके लावताना दिसत आहे.
तृप्ती डिमरी 'Animal पार्क', 'भूलभूलैय्या 2', 'धडक 2' मध्येही दिसणार आहे. याशिवाय 'आशिकी 3' साठीही तिची चर्चा आहे. तृप्तीने Animal च्या आधीही 'कला', लैला मजनू','बुलबुल' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. यातीलही तिच्या भूमिका विशेष गाजल्या.