रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली तृप्ती डिमरी, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:19 IST2024-12-16T15:18:43+5:302024-12-16T15:19:52+5:30
Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरी नुकतीच कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंटसोबत स्पॉट झाली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली तृप्ती डिमरी, व्हिडीओ होतोय व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) तिच्या सौंदर्याने आणि बोल्डनेसने चाहत्यांना चकित करत असते. रणबीर कपूर(Ranbir Kapoor) सोबत 'ॲनिमल' (Animal Movie) चित्रपटात दिसल्यानंतर तृप्ती नॅशनल क्रश बनली आहे. अलिकडेच ती कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३' या चित्रपटात दिसली होती, जो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. दरम्यान, तृप्ती डिमरी नुकतीच तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की, तृप्ती डिमरी आणि सॅम मर्चंटसोबत एका कॅफेमधून बाहेर पडताना दिसत आहेत, जेव्हा पापाराझींनी त्यांना घेरले आहे.
या व्हिडिओमध्ये तृप्ती डिमरी काळ्या टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे, तर सॅम मर्चंट पांढऱ्या टी-शर्टमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की तृप्ती पापाराझींना पाहताच, त्यांना फोटो क्लिक करण्यास नकार देते आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर लोक खूप कमेंट करत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, 'व्वा, काय बात आहे?' तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'चला, नॅशनल क्रशलाही बॉयफ्रेंड मिळाला.'
या चित्रपटांमध्ये झळकलीय तृप्ती डिमरी
तृप्ती डिमरी हिने २०१७ मध्ये रिलीज झालेल्या 'मॉम' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर २०१८ मध्ये ती 'लैला मजनू' चित्रपटात दिसली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. पण तृप्तीच्या 'बुलबुल' चित्रपटाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटातील आपल्या अभिनयाने अभिनेत्रीने लोकांना खूप प्रभावित केले. याशिवाय तृप्ती डिमरी कला, 'ॲनिमल', विकी और विद्या का वो व्हिडिओ, भूल भुलैया ३ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. भूल भुलैया ३ हा तृप्तीच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. आता अभिनेत्रीच्या पाइपलाइनमध्ये अनेक मोठे सिनेमे आहेत.