'अ‍ॅनिमल'च्या वादावर तृप्ती डिमरीचं सडेतोड उत्तर, म्हणाली- 'चित्रपटाचा त्रास होत असेल तर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 07:50 PM2023-12-13T19:50:13+5:302023-12-13T19:54:01+5:30

'अ‍ॅनिमल' चित्रपटातील 'झोया' या व्यक्तिरेखेसाठी तृप्तीचे खूप कौतुक होत आहे.

Trupti Dimri's response to 'Animal' cinema controversy | 'अ‍ॅनिमल'च्या वादावर तृप्ती डिमरीचं सडेतोड उत्तर, म्हणाली- 'चित्रपटाचा त्रास होत असेल तर...'

'अ‍ॅनिमल'च्या वादावर तृप्ती डिमरीचं सडेतोड उत्तर, म्हणाली- 'चित्रपटाचा त्रास होत असेल तर...'

१ डिसेंबरला रिलीज झालेला रणबीर कपूर अभिनीत 'अ‍ॅनिमल'हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरीचाही जबरदस्त कॅमिओ होता. या चित्रपटातील 'झोया' या व्यक्तिरेखेसाठी तृप्तीचे खूप कौतुक होत आहे. तर दुसरीकडे चित्रपटाच्या आशयावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे बराच वाद होतोय. हा चित्रपट समाजासाठी धोकादायक असल्याचे वर्णन करण्यात येत आहे. या वादावर तृप्ती डिमरीने  प्रतिक्रिया दिली आहे.

तृप्ती डिमरी द क्विंटशी संवाद साधताना म्हणाली, 'चित्रपटाबद्दल प्रत्येकाचे स्वतःचे मत असू शकते. जर कोणाला चित्रपटाचा त्रास होत असेल तर तो पाहू नये. हे प्रत्येकासाठी वेगळं आहे. जर तुम्ही अ‍ॅक्शन फिल्म पाहत असाल. त्यात गुंडांनी नायकाला मारहाण केली असेल. तर याचा अर्थ असा होत नाही की वास्तविक जीवनात तुम्हीही जी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही, तिला जावून मारावं. जर पत्नीशी किंवा मैत्रिणीशी उद्धटपणे बोलले गेले असेल, तर तुम्हाला तुमच्या घरी जाऊन असेच बोलण्याचा परवाना देत नाही. 

पुढे ती म्हणाली, 'ज्यांच्यावर चित्रपटाचा प्रभाव पडला आणि त्यांना त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जर काही गोष्टी तुम्हाला योग्य वाटत नसतील तर त्या पाहू नका'. तर 'अ‍ॅनिमल'च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्याने ११ दिवसांत ४४५.१२ कोटींची कमाई केली आहे. सिनेमाने जगभरात ७३७.५० कोटी रुपयांचे कलेक्शन केले.  तृप्ती डिमरी शिवाय या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही भूमिका आहेत.
 

Web Title: Trupti Dimri's response to 'Animal' cinema controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.