TJMM Box Office Collection: 'तू झूठी मैं मक्कार'ची 7 व्या बॉक्स ऑफिसवर जादू ओसरली; केली इतक्या कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 06:09 PM2023-03-15T18:09:28+5:302023-03-15T18:14:40+5:30

'तू झूठी मैं मक्कार' सातव्या दिवसाचे कलेक्शनचा आकडा समोर आला आहे.

Tu jhoothi main makkar box office collection day 7 ranbir kapoor shraddha kapoor starrer film earned lowest | TJMM Box Office Collection: 'तू झूठी मैं मक्कार'ची 7 व्या बॉक्स ऑफिसवर जादू ओसरली; केली इतक्या कोटींची कमाई

TJMM Box Office Collection: 'तू झूठी मैं मक्कार'ची 7 व्या बॉक्स ऑफिसवर जादू ओसरली; केली इतक्या कोटींची कमाई

googlenewsNext

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार' (Tu Jhooti Main Makkaar) 8 मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटला आहे. त्याच वेळी, विकेंडला चांगली कमाई केल्यानंतर, आठवड्याच्या दिवसात चित्रपटाची कमाई कमी होताना दिसत आहे. दरम्यान, सतव्या दिवसाचं कलेक्शनचा आकडा समोर आला आहे....

शाहरुखच्या पठाणनंतर 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhooti Main Makkaar Box Office Collection) हा हिट ठरणारा 2023 मधील दुसरा चित्रपट आहे. 'तू झूठी मैं मक्कार' सातव्या दिवसाचे कलेक्शनचा आकडा समोर आला आहे. सहा दिवसांमध्ये या चित्रपटाने 76.24 कोटींची कमाई केली आहे. आता सातव्या दिवशी म्हणजेच 14 मार्चला 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाने 6.05 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने सात दिवसात 82.34 कोटींचे कलेक्शन केलं आहे.  त्यामुळे आता हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


'तू झुठी मै मक्कार' सिनेमा रणबीर कपूर, श्रद्धा कपूर सोबतच बोनी कपूर यांनी देखील अभिनयात पदार्पण केले आहे. तर डिंपल कपाडियाही मुख्य भूमिकेत आहे.सिनेमा लव्ह रंजन यांनी दिग्दर्शित केला आहे. याआधी त्यांनी 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' या रोमॅंटिक कॉमेडी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.
 

Web Title: Tu jhoothi main makkar box office collection day 7 ranbir kapoor shraddha kapoor starrer film earned lowest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.