Tumbbad 2 : ६ वर्षांनी पुन्हा येतोय हस्तर, 'तुंबाड' पुन्हा प्रदर्शित होताच सीक्वलची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 02:28 PM2024-09-14T14:28:35+5:302024-09-14T14:29:04+5:30

थिएटर आणि बॉक्स ऑफिस गाजवलेला 'तुंबाड' ६ वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. याबरोबरच चाहत्यांना एक खास सरप्राइजही मिळालं आहे. 

Tumbbad 2 sequel of tumbbad movie announcement after 6 years | Tumbbad 2 : ६ वर्षांनी पुन्हा येतोय हस्तर, 'तुंबाड' पुन्हा प्रदर्शित होताच सीक्वलची घोषणा

Tumbbad 2 : ६ वर्षांनी पुन्हा येतोय हस्तर, 'तुंबाड' पुन्हा प्रदर्शित होताच सीक्वलची घोषणा

२०१८ साली प्रदर्शित झालेला 'तुंबाड'सिनेमा प्रंचड गाजला. हा हॉरर सिनेमा सुपरहिट ठरला होता. 'तुंबाड' सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं होतं. या सिनेमाला प्रेक्षकांकडूनही तुफान प्रतिसाद मिळाला होता. उत्कृष्ट कथा, सिनेमॅटोग्राफी आणि क्लायमॅक्समुळे 'तुंबाड' सिनेमाने शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. थिएटर आणि बॉक्स ऑफिस गाजवलेला 'तुंबाड' ६ वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. याबरोबरच चाहत्यांना एक खास सरप्राइजही मिळालं आहे. 

'तुंबाड' सिनेमा पुन्हा प्रदर्शित करताच सिनेमाच्या मेकर्सने एक मोठी घोषणा केली आहे. 'तुंबाड' सिनेमानंतर त्याच्या सीक्वलची मागणी चाहत्यांकडून होत होती. आता मेकर्सने चाहत्यांना सरप्राइज देत 'तुंबाड २' ची घोषणा केली आहे. 'तुंबाड' सिनेमाच्या शेवटी त्याच्या सीक्वलाबाबत हिंट देण्यात आली आहे. 'तुंबाड २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल ६ वर्षांनी तुंबाडचा सीक्वल येणार असल्याने चाहतेही आनंदी आहेत. 

सोशल मीडियावर तुंबाड सिनेमाच्या स्क्रिनिंदरम्यानचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये शेवटी सिनेमा संपल्यावर "तुंबाड २ coming soon "असं लिहून येत असल्याचं दिसत आहे. "वापस खुलेगा तो हस्तर भी फिर आएगा? प्रलय, प्रलय आएगा।" असंही व्हिडिओत म्हटलं आहे. त्यामुळे 'तुंबाड'नंतर आता 'तुंबाड २' साठी प्रेक्षक आतुर आहेत. 

Web Title: Tumbbad 2 sequel of tumbbad movie announcement after 6 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.